बेवारस अवस्थेत औरंगाबाद शहरात ५ वर्षापासून फिरणाऱ्या मतीमंद व अपंग व्यक्तीला जवाहरनगर पोलिसांनी व माणुसकी समूहाने दिला आधार
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे बेवारसान साठि मदतकार्य

औरंगाबाद प्रतीनीधी/
जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत
सूर्यकांत अण्णा उदावंत वय ५० वर्ष गेल्या ५ वर्षापासून गारखेडा परिसरात बेवारस अवस्थेत फिरत होता.एवढ्या कडक उन्हात तो फिरत असल्याने मळलेले कपडे हातात एक पिशवी पायात चप्पल देखील नाही पोटाला लागलेली भूक त्याच्याकडे पाहून ह.भ.प. हरिश्चंद्र राठोड महाराज यांनी माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीस विचारपूस केली असता.
त्याला बोलता देखील येत नव्हते चालताही येत नव्हते त्यांला अर्धाग वायु पँरेलेस झालेला होता.तो रडायला लागला जणू त्याचे या जगात कोन्हिच नाही ह.भ.प.हरिश्चंद्र राठोड महाराज यांनी माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीस विचारपूस केली असता.
सदरील व्यक्तीची माहिती जवळील जवाहरनगर पोलीसांना दिली असता त्या व्यक्तीस ते पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले.त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता त्याची शहरात हणुमान नगर गारखेडा परीसरात बहिण राहत असल्याचे पोलीसांना समजले.तीची आर्थिकदृष्ट्या गरीबीची असल्याने भावाचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
पी.एस.आय.शळके यांनी अशा व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांना उपपोलीस निरीक्षक वसंतराव शेळके यांनी फोनद्वारे माहिती देवुन पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले.व सदरील व्यक्ती ची माहिती दिली.मळकटलेले कपडे,अंगातुन येनारी दुर्गंधी पाहून समाजसेवक सुमित पंडित यांनी त्याची दाढी,केस कापून स्वच्छ अंघोळ घालुन त्याला नवीन कपडे परिधान केले. अर्ध्यातासात जणू त्याचे जीवनच बदलल्या सारखे जाणवले व त्याच्या पुढील पुनर्वसनासाठी पोलीस निरीक्षक संतोष ऐ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कागदोपत्री पूर्तता करून नव्याने सुरू झालेल्या माणुसकी वृद्ध सेवालय धोपेश्वर जटवाडा येथे अन्न वस्त्र निवारा या करिता समाजसेवक यांनी स्वतः घेऊन गेले व त्याच्या पुढील राहण्याची व्यवस्था माणुसकी वृद्ध सेवालय हे घेणार असल्याचे सांगितले या सामाजिक कार्यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष ऐ पाटील,पोलीस उपनिरीक्षक वसंतराव शेळके व इतर जवाहरनगर पोलीस कर्मचारी व ह.भ.प.हरिश्चंद्र राठोड महाराज,सतीश गचके सर, समाजसेवक सुमित पंडित डॉ.रंजना प्रशांत दंदे,
समाजसेविका पूजा पंडित आदींनी मदत कार्य केले.