Uncategorized
शिरपूर येथे धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी
शिरपूर:
संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 365वी जयंती दिनांक 14 मे रोजी सायंकाळी स्थानिक बस स्थानक चौकातील संभाजी ब्रिगेडच्या बोर्ड समोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अतिथी शिरपूर पोलिस स्टेशनचे पो.नि. सुनील वानखडे व ओमकार स्वयंम सा. समूहाचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, राजु देशमुख, शशिकांत देशमुख,शंकर वाघ, सेवा सोसायटी शिरपूर चे नवनिर्वाचित सदस्य राजेश जाधव, गजानन देशमुख,बंडू जाधव, अमोल देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तसेच विरभगतसिंग विद्यार्थी परिषदचे पदाधिकारी व इतर शंभू प्रेमी उपस्थित होते….

