जावायाने केला सासु व मेव्हणीचा खून
शेलुबाजार येथील घटना
मंगरूळ प्रतिनिधी : जावयाने सासू
आणि मोठ्या मेहुणीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघीही ठार झाल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. आरोपी सचिन धर्मराज थोरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संपत्तीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शेलुबाजार येथील वार्ड क्र. २ मध्ये निर्मला पवार राहतात. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी विजया गुंजावळे ही जिंतूर (जि. परभणी ) येथील रहिवासी असून आईला भेटण्यासाठी ती शेलुबाजार येथे आली होती तर लहान मलीचा पती सचिन थोरात हा पुण्यात कामानिमित्त राहतो, तो आज सकाळीच पुण्याहून
शेलूबाजार येथे आला व थेट सासूच्या घरी जाऊन सोबत आणलेल्या सुरीने सासू निर्मला आणि मेहुणी विजया यांच्यावर वार केले. यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी सचिन पळून जात असताना पोलीस शिपाई ज्ञानेश्वर राठोड, गोपाल कव्हर, संदीप खडसे यांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार सुनील हुड यांचे मार्गदर्शनात एपीआय मंजुषा मोरे, एएसआय अनिरुद्ध भगत, हेकॉ ज्ञानेश्वर राठोड, पोकॉ संदिप खडसे, गोपाल कव्हर, अंकुश मस्के यांनी घटनास्थळ गाठून आरोपीस अटक केली. तसेच आरोपीवर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मंजुषा मोरे करीत आहेत.