आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसंपादकीय

शहरातील अनाधिकृत होर्डींग व बॅनर हटविण्याची माळी युवा मंचची मागणी

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

वाशीम – शहरातील विविध ठिकाणी लागलेले अनाधिकृत होर्डीग व बॅनर हटविण्याची मागणी माळी युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष नागेश काळे यांच्या मार्गदर्शनात व शहराध्यक्ष वैभव उलेमाले यांच्या नेतृत्वात १० ऑगष्ट रोजी यासंदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देवून ही मागणी करण्यता आली. शहरातील विविध रस्त्यावर, इमारतींवर, सरकारी मालमत्तेवर, महावितरणच्या इलेक्ट्रीक खांबावर व चौकाचौकात अनाधिकृत होर्डीग लावण्यात आले आहेत. यामुळे शहर विद्रुपीकरणाला हातभार लागत असून नागरीकांसह रहदारीला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी लागलेले अनाधिकृत होर्डीग व बॅनर त्वरीत हटविण्यात यावे. याचबरोबर शहरात लावण्यात आलेेल्या अधिकृत होर्डींगची यादी संघटनेला द्यावी अशी मागणी उलेमाले यांनी केली आहे. निवेदन देतांना झेप फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत भडके, शिवसैनिक पिंटु काळे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे