Uncategorized

संवेदनशील मृदु स्वभावाचे कर्तबगार,कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके साहेब……

           साताऱ्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची समाजप्रिय इमेज आणखी अधोरेखित करणारा एक डॅशिंग अधिकाऱ्याची सर्वत्र चर्चा आहे.ते येतात,ते पाहतात अन ते जिंकतात अशी कर्तबगारी देखील त्यांनी अल्पावधीत कमावली आहे.खूप मोठ्या पदावर काम करण्याची क्षमता असलेल्या सातारच्या लाडक्या पो नि विश्वजीत घोडके साहेब यांच्यानिमित,,
            खरतर,कोरोनाच्या वाढत्या पादुर्भाव आणि शासकीय निर्बंधांमुळे बऱ्याच क्षेत्रातील लोकांना आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करण्यात मर्यादा आल्या.अनेक अधिकाऱ्यांची कर्तबगारी,हुशारी अवघी शासकीय नियमांचे पालन करून घेण्यात खर्ची पडली.. साताराचे पोलिस निरिक्षक  विश्वजीत घोडके हे या श्रेणीतील खूप मोठे नाव!!!
      विश्वजीत घोडके साहेब म्हणजे अन्यायाला वाचा    फोडणारा..न्यायप्रिय..त्यांचे प्रश्न त्वरित हातावेगळा करणारा..शिस्तप्रिय.. लोकांमध्ये राहणारा..लोकप्रिय..मित्रांमध्ये रमणारा..मित्र…प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने पाहणारा…संवेदनशील…प्रत्येक घटनेचा पुरेपूर अभ्यास करणारा..अभ्यासू..सहकाऱ्याला पुरेपूर स्वातंत्र्य देणारा… कुटुंबवत्सल..अन कायदा सुव्यवस्थेला प्रधानक्रम देणारा…सिंघम!!!पोलीस अधिकाऱ्याकडे एवढी सगळीच रूपे कमी अधिक प्रमाणात असतात..’जसा देश तसा वेश’ यथा राजा तथा प्रजा अशीच पद्धत सर्वत्र पाहायला मिळते. साहेबांनी आपल्यातील सकारात्मक ऊर्जेने पुसेगांव व सातारा तालुका पोलीस ठाण्याची कार्यक्षमता वाढवली..प्रत्येक कर्मचाऱ्यांमधील क्षमता ओळखून त्यांना त्यांच्या आवडीच्या कामात गुंतवले त्यामुळे सातारा तालुका पोलीस ठाणे अधिकाधिक लोकाभिमुख होत गेले.
       असे म्हणतात,पोलिसांची दोस्ती पण वाईट अन दुष्मनीही..!त्यामुळे शहाणा माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढत नाही…पण अलीकडे ही परिस्थिती बदलली आहे.’लॉ अँड ऑर्डर’ नागरिकांशी समन्वय ठेवून देखील चांगल्या पद्धतीने ठेवता येतो हे साहेबांनी कृतीने दाखवून दिले आहे.त्यामुळेच ऐतिहासीक प्रसिद्ध असलेला जिल्हयामधील सातारा तालुका  क्राईम रेट मध्ये देखील थंड पडला आहे..!
         अर्ध्या रात्रीलाही मित्रांच्या अडचणीत उभे राहणारे साहेब,यारों के यार आहेत…!त्यांचा मित्रांची भली मोठी यादी पाहिली की ते मैत्रीत किती समृद्ध आहेत याची प्रचिती येते..कोणत्याही क्षेत्रात त्यांचा एक हक्काचा माणूस असतोच असतो..त्यामुळे त्यांच कधीच कलसच काम अडून राहत नाही..!मित्राला सहकार्य करण्यासाठी हा माणूस सगळ्या सिमा,बंधन झुगारून उभा राहतो..’यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ अस नकळत गुणगुणारा हा अवलिया मैत्रीच्या दुनियेतील ‘राजा माणूस’ ठरतो…!
        खरतर,पोलिसाची नोकरी म्हणजे 24 तास ‘ऑन ड्युटी’…!त्यामुळे साहेबांचे शेड्युल कायमच बिझी..अशा व्यस्त दिनचर्येत नातलगांना,मित्रांना,कुटुंबाला,मुलांना वेळ देणं अवघडच!!पण,त्यावर उपाय म्हणून साऱ्या सावारा शहरालाच साहेबांनी आपलं कुटुंब मानलं!
        खरंतर, आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न साहेबांनी पाहिलं होतं, त्यासाठी खडतर परिश्रम करून,प्रचंड अभ्यास देखील साहेबांनी केला होता..पण,’वक्त से पेहले और किस्मत से ज्यादा किसीं को कुछ नहीं मिलता..!’हा शेर साहेबांच्या जीवन प्रवासाशी तंतोतंत जुळतो..पण ‘मेरे हक मे जो बेहतर होगा वही मुझे मेरा खुदा देगा…!’हे सत्य स्वीकारून साहेबांनी आपल्या अभ्यासाचा खडतर परीश्रमाचा फायदा लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी अविरतपणे सुरू ठेवला आहे.
           घोडके साहेबांसारख्या लोकप्रिय अधिकाऱ्यांबाबत प्रत्येकाच्याच मनांत एक कृतज्ञतेचा भाव असतो..आदर आणि अभिमान देखील असतो…तो व्यक्त करण्यासाठी काहीतरी निमित्त लागतेच…आज त्यांच्या मैत्रीच्या निमित्ताने आज ती संधी आम्हाला उपलब्ध झाली. 
   शेवटी एकच,
उंच उंच जात रहा
आधार आम्हा देत रहा
पाठीशी सदैव राहू
गीत कर्तृत्वाचे गाऊ…!
घोडके साहेबांच्या स्वप्नपूर्तीचा काळ येवो…भविष्यात जिल्हयातच  त्यांना पूढील प्रमोशन मिळत राहो…!आमच्या हक्काचा माणसाच्या कर्तबगारी,हुशारी,शहाणपण,शिस्त,इत्यादीबरोबरच मैत्रीचा सुगंध या परिसरात दरवळत राहो…व सदैव आमच्यावर प्रेम राहो …!

शब्दांकन – श्री.शैलेश धुमाळ
माहिती संकलन श्री.उदय आठल्ये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!