जळगांव येथील अत्यंत गरीब परिस्थितीतुन आणि मोलमजुरी करून सुशांत सुनील इंगळे झाला नौदलात भरती
जळगांव येथील अत्यंत गरीब परिस्थितीतुन आणि मोलमजुरी करून सुशांत सुनील इंगळे झाला नौदलात भरती
लोकशाही मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने जळगाव येथील सुशांत सुनील इंगळे यांचे नौदल सेनेमध्ये भरती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला जळगाव जिल्हा येथील वाघ नगर मध्ये रहिवाशी असलेले सुशांत इंगळे हे अत्यंत गरीब परिस्थिती मधून सुशांत चे वडील सुनील इंगळे हे 24 तास दारूच्या नशेत असायचे त्याच्या आई चा विवाह झाल्या पासून वडिलांनी दारूच्या नशेत सतत आईला मारहाण करणे घराच्या बाहेर काढणे अशा परिस्थितीत त्याला त्याच्या आईने वडिलांच्या त्रासाला कंटाळून अनेक वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. आपल्या लहान दोन चिमुकल्या कडे बघूनच हिम्मत न हारता येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामना केला खचूनन जाता ६ वी पर्यन्त जळगांव जिल्हा येथे शिक्षण पूर्ण केले व पुढच्या शिक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे मीना सुनील इंगळे यांनी आई,वडील यांचे घर गाठले आई,वडील अशिक्षित असल्यामुळे गावात , दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून सुशांतचे शिक्षण पूर्ण केले व सुशांत चे मामा विनोद थाटे यांनी सुद्धा नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केले व शिक्षणासाठी मदत केली व सुशांत ने देखील गरिबीची जाणीव करून मोबाईल जवळ न बाळगता आपला अमूल्य वेळ उज्ज्वल भविष्यासाठी दिला अभ्यासात लक्ष दिले व दहावी मध्ये 99%टक्केवारी घेत उत्तीर्ण होऊन उंच शिखर गाठून भरारी घेत 10 th दहावी मध्ये 99% टक्केवारी नुसार नौदलाच्या जागा निघाल्या व फॉर्म भरला त्याच्यात सुद्धा त्याला नौदल मध्ये निवड झाली आहे असे पत्र पोस्टाने घरी आले ओडीसा राज्यात तुमची ट्रेंनिग आहे हजर राहणे रेल्वेचे तिकीट सुद्धा पाठवण्यात आले. अशा गरीब परिस्थितीत खंबीरपणे आईने राब राब कष्ट करून लहानसे मोठे केले त्याचीच उपकाराची परत फेड आज सुशांत ने केली नौदल सेनेत (नेव्ही) मध्ये, ओडीसा येथे ट्रेनिंग पूर्ण करून 3 महिन्या नंतर घरी आला सुशांत च्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज दिनांक:-४ वार गुरुवार रोजी जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे लोकशाही मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी पत्रकार बांधवांन कडून शॉल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे, लोकशाही मराठी पत्रकार संघ मराठवाडा विभागीय सचिव प्रवीण तायडे, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोरे ,धरणगाव तालुका अध्यक्ष महेंद्र चौधरी, धरणगाव तालुका कार्याध्यक्ष प्रमोद परदेशी,पाचोरा तालुकाध्यक्ष शेख जावेद ,पत्रकार मुसा तडवी, जळगाव संपर्कप्रमुख निलेश वाणी टीव्ही नाईन मराठी न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी अनिल केऱ्हाळे अरविंद मानकरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हा, रवींद्र पाटील युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते