अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरपूर शाखेच्या वतीने वृक्षारोपण
















शिरपूर: एक करोड वृक्षारोपण या अभियाना अंतर्गत ३ ऑगस्ट २०२२ रोजी कै. कोंडबा तात्या ढवळे विद्यालय शिरपूर जैन , पोलीस स्टेशन आवार व एबिसी किड्स कॉन्व्हेंट मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरण संरक्षण प्रतिज्ञा घेण्यात आली.
स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नियमित समाज उपयोगी कार्यात सहभाग घेतला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या विषयी विशेष पुढाकार घेतल्या जातो. व शक्य तेवड्या समस्या मार्गी लावण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करीत असते. सोबतच इतरही सामाजिक कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात. त्यानुसार ३ जुलै रोजी गावातील नामांकित संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. कोंडबा तात्या ढवळे विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन वाहुरवाघ, उपमुख्याध्यापक धनंजय नाकाडे, शिक्षक आनंद देशमुख, वाळले,गजानन भालेराव, सर्जेराव सर यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन शिरपूरच्या आवारामध्ये सुद्धा पोलीस निरीक्षक सुनील वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी “एकत्र येऊ या नवा विचार पेरू या”, “अधिकाधीक झाडे लावुन धरतीला सजवु” या असा संदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला. वृक्षरोपण कार्यक्रमाविषयी पोलीस निरीक्षक वानखडे व कै. कोंडबा तात्या ढवळे विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन वाहुरवाघ यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी अभाविप चे नगरमंत्री विजय बाविस्कर, नगरसह मंत्री तेजस मारवाडी, किरण देशमुख, सुमित बरांडे, ओंकार वाघ, शुभम भांदुर्गे, विशाल धोंगडे, राहुल हंगे, शिवमंगल देशमुख, विशाल भालेराव, अभिषेक भालेराव, व्यंकटेश देशमुख, विनायक इंगोले, सौरभ धोंगडे, हर्षल भूरे, शुभम अजगर आदी उपस्थित होते.