Uncategorized

गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे उत्कृष्ट पत्रकार व साहित्यिक पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी)

विक्रोळी येथील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार, गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांना दादर माटुंगा कल्चरल सेंटर सभागृहात वुमन वेल्फेअर फोरम. यांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार व साहित्यिक पुरस्कार महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षा ज्योती ठाकरे राज्यमंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य डॉ सौ सारिका पाटील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी नायर हॉस्पिटल मुंबई यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यावेळी त्यांना स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ सन्मानपत्र गौरव करून मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला प्रारंभी दिलीप गाडेकर यांनी वुमन वेल्फेअर फोरम बद्दल माहिती देऊन 25 वर्षा चे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती दिली प्रभाकर तुकाराम कांबळे यांचे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य फार मोठे आहे त्यांना यापूर्वी दोनशेहून ज्यादा पुरस्कार प्राप्त केले आहेत निर्भीडपणे त्यांचे कार्य असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष यांनी निवड केली. मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर. वनिता फाउंडेशनचे अध्यक्षा वनिता कांबळे गुणवंत कामगार सिद्राम गाडेकर समाजसेवक राजेंद्र कांबळे आदीनी प्रभाकर कांबळे यांचे अभिनंदन केले . नंदकिशोर मसुरकर यांनी सूत्रसंचालन केले व सुरज भोईर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!