आगामी निवडणुकीत महिला राष्ट्रवादी महत्वपूर्ण भूमिका निभावेल प्रा.कविता म्हेत्रे


सांगली :- जिल्हा व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फ़े प.महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.कविता म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संदर्भांत चर्चा करून पक्ष बांधणीविषयी प्रा.कविता म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले.या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योतीताई आदाटे महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव ,शहर महिला आघाडीच्या सांगली शहराध्यक्ष अनिता पांगम , मिरज शहराध्यक्ष वंदना चंदनशिवे,कुपवाड शहराध्यक्ष वैशाली कळके, ई कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.कविता म्हेत्रे म्हणाल्या,शरद पवार यांनी दिलेल्या महिला आरक्षणामुळे महिलांना सर्वच क्षेत्रात राजकीय व्यासपीठ मिळाले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम महिलांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाला वाव दिला आहे.याउलट केंद्रातील भाजप सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनमानाचे बजेट महागाईमुळे कोलमडले आहे.घरगुती गॅस,खाद्य तेल यांचा भडका उडाला आहे.गेली दोन वर्ष कोरोनाने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यात ही महागाई आणखी खिसे रिकामे करत आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समाजाभिमुख ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करून राष्ट्रवादी महिला काँग्रेस महत्वपूर्ण भूमिका निभावेल.या बैठकीत दिव्यांग सेलच्या अध्यक्षा आशा पाटील, कामगार सेलच्या अध्यक्षा उषा गायकवाड, प्रियांका तुपलोंडे,छाया पांढरे स्वाती शिरूर,पुजा कोलप,राणी कामटे,संगिता हेगडे,इ उपस्थित होते.