Uncategorized

स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल…

शहरातील होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा न .प.ला दिले निवेदन स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास मुख्याधिकारी याना तेच पाणी पाजू असा इशारा मनसे सैनिक रितेश देशमुख यांनी निवेदनातून दिला ….

वाशिम :- शहरात ठीक ठीकानी गढूळ पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.एकीकडे दहा ते बारा दिवसाड पाणी पुरवठा होत आहे.या परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठाहोत नसल्याने अपव्यय होणाऱ्या पाण्याचाच नागरिक वापर करतात शिवाय या पाण्यामुळेरस्ता ही खराब झाला आहे.नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणी न देऊ शकणार नगर पालिका प्रशासनाने जनतेच्या समस्या जर सोडलवल्या नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असा इशारा मुख्याधिकारी यांना निवेदनातून मनसे सैनिक रितेश देशमुख यांनी दिला. यावेळी उपस्थित मनसे सैनिक उमेश टोलमारे, वैभव काळे, उदय जामकर,गजानन वैरागडे मनसे वाहतूक सेना जिल्हाउपाध्यक्ष इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!