Uncategorized

शिरपूर जैन येथील बि.एस.एन.एल. फायबर सेवा केबल कट होण्याच्या कारणाने वारंवार विस्कळीत


शिरपूर : भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची फायबर ही इंटरनेट सेवा शिरपूर जैन येथील अनेक बँका, दुय्यम निबंधक कार्यालय जेथे मालेगांव तालुक्यातील शेत जमीन आणि जागेचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, बहुतांश ऑनलाइन सेवा देणारे सुविधा केंद्र, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस इत्यादी कार्यालयाच्या कामकाजावर वारंवार परिणाम होत आहे.
ज्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली जात आहेत.
शिरपूर मालेगांव रोड च्या बाजूने शेता मधून केबल टाकण्यात आलेली असून शेतकऱ्यांकडून शेतीची मशागत किंवा बांधाची दुरुस्ती करतांना वायर तुटण्याची घटना घडतात
सदर तुटलेली केबल जोडण्यास बी एस एन एल कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कडून दुरुस्ती कामात दिरंगाई होत असल्याने सेवा सुरळीत होण्यास व्यत्यय येत आहे.

1)सध्या शेतकऱ्यानं कडून शेतात पाटाच्या दुरुस्तीची कामे जे.सी. बी.मशिन्स च्या साहाय्याने केली जात आहेत. त्यामुळे जमिनी खालून टाकण्यात आलेली केबल वारंवार तुटल्या जात आहेआम्ही तातडीने काम करण्याचा प्रयत्न करतो फॉल्ट मोठा असल्यास कधी कधी वेळ लागतो. – आशिष देशमुख, खाजगी कंत्राटदार


२) आम्ही सुरळीत सेवा देण्यावर नेहमीच लक्ष देऊन असतो, यापुढे अशा प्रकारे काही तांत्रीक समस्या आल्यास लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी संबंधितांना सूचना देतो. – हरीश बागडे डी.जि. एम.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!