Uncategorized

शासकीय विहीर व जलकुंभ जमीनदोस्त केल्याप्रकरणी विस्तार अधिकारी सतिष नायसे कडून चौकशी पूर्ण

अहवाल जि.प.कडे सादर करणार असल्याची माहिती !शिरपूर :
दि १७ मार्च रोजी जानगिर महाराज संस्थानच्या कमानी नजीकची शासकीय निधीतून बांधण्यात आलेले जलकुंभ जेसीबी मशिनच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आला होता. सदर जलकुंभ जमिनदोस्त केल्यानंतर दिनांक २०मार्च रोजी दै. लोकमत मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खरबडून जागे झाले होते व सरपंच व गटविकास अधिकारी यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती.
तसेच येथील वार्ड क्रमांक ३ मराठी कन्या शाळेच्या पाठीमागील बाजूस एका प्रार्थनास्थळ च्या समोर सरकारी जागेत असलेली सार्वजनिक विहीर, शासकीय मालमत्ता शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बुजवण्यात येवून त्याठिकाणी शासकीय निधीतून पेव्हरब्लॅक बसवण्यात आले आहेत. सदर प्रकरणी दैनिक लोकमतने दिनांक १२/०४/२०२२ रोजी वृत्त प्रकाशित करताच जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन सदर दोन्ही प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा केला त्यामुळे मुख्यकार्यकारी अधीकारी वसुमना पंत यांनी दिनांक १२/४ /२०२२ रोजीच विस्तारअधिकारी सतिष नायसे यांना लेखी पत्राद्वारे चौकशीचे आदेश दिले होते सदर प्रकरणी दिनांक १७ मे रोजी चौकशी पार पडली यावेळी नाय्से यांनी दोन्ही ठिकाणी भेट देवून, जानगीर महाराज संस्थांचे मठाधिपती प.पु.महेश गिर बाबा नागरिकांकडून जलकुंभा संदर्भात काही पुरावे गोळा केले तर विहीर बुजवल्या प्रकरणी तक्रारदार यांचे कडून आणखी काही पुरावे घेतले तर दोन्ही ठिकाणी नागरिकांकडून जबाब घेतले. व आपला चौकशी अहवाल पुढील ४ ते ५ दिवसांत जि.प.कडे सदर करणांर अशी माहिती दिली. त्यामुळे सदर गंभीर प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाल्यास नक्कीच दोषींवर कारवाई होणार अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!