वृक्ष लागवडीच्या नावाखाली शेतीचे अतिक्रमणे निष्काशीत होणार नाही या बाबत पुन्हा प्रशासकीय बैठक लावा

भाई जगदीश कुमार इंगळे यांची मागणी
तेल्हारा प्रतिनिधीः- आनंद बोदडें- तेल्हारा तालुक्यातील शेतीसाठी केलेले अतिक्रमणे वृक्ष लागवडीचे नावाखाली निष्काशीत होणार नाही यासाठी पुन्हा प्रशासकिय बैठकिचे आयोजन करण्यात यावे ग्रामीण भागात अनुसुचीत जाती/जमातीच्या लोकांनी महसुल व वन विभागाच्या जमीनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करुन जिवनाआश्यक जिन्नसाची पेरणी करतात दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जमीनीची मशागत करुन पेरणी करनार आहेत परंतु प्रशासकिय पातळीवर बैठक घेवुन अतिक्रमण मुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सन २०२२ च्या खरीप हंगामात अतिक्रमण धारकांची तारांबळ उडाली आहे, म्हणुन दलीत पॕंथरचे केद्रींय कार्याध्यक्ष तथा बिगर ७/१२ शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिशकुमार इंगळे यांणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेवुन शेतीचे अतिक्रमणे वगळुन अतिक्रमण मोहीम राबविण्यात यावी आणी पुन्हा,प्रशासकीय बैठक लावण्यात यावी अन्यथा अकोला जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे भव्य मोर्चा दि. २५ मे रोजी काढण्यात येणार असा ईशारा भाई जगदिशकुमार इंगळे यांणी निवेनाव्दारे दिला आहे यावेळी निवेदन देते वेळी रिपाई शहर अध्यक्ष भारत पोहरकार , दादराव इंगळे , प्रकाश वानखडे, बाळकृष्ण वानखडे, रमेश वानखडे अशोक कासोटे सुनिता वानखडे , माणीकराव वानखडे ,विजय लबडे मुकिंदा बोदडे, गुलजार महल्ले नाभाई भैड्या यांचेसह अनेक अतिक्रमण धारक नागरीक उपस्थित होते