प्रगतशील शेतकऱ्यांच्या पाठीवर ओंकार स्वयं सहायता समूहाची शाबासकीची थाप


उद्योगधंद्यासाठी युवकांना केले अर्थसहाय्य
रोज देवळात गेल्याने जेवढे पुण्य लाभते.त्यापेक्षा अधिक पुण्य गरजूंना मदत केल्याने लाभत असते.’नाही रे’ वाल्यांसाठी ‘आहे रे’ वाल्यांना पुढे आणण्याचा आदर्श पायंडा ओंकार स्वयं सहायता समूहाने पाडला आहे.याच पायवाटेने इतरांनी सुद्धा गेले पाहिजे.असे विचार याप्रसंगी अनंतराव देशमुख यांनी व्यक्त केले.शेतकरी सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते याप्रसंगी बोलत होते.
समाजाला प्रगतीच्या दिशेने न्यायचे असेल,तर खांद्यावर हात ठेवणारे नव्हे तर खांद्यावर जबाबदारी घेणारे नेतृत्व हवे असते.नेमके तेच कार्य ओंकार स्वयं सहायता समूह करत आहे.असे प्रतिपादन माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी स्थानिक विश्वकर्मा सभागृहात संपन्न झालेल्या शेतकरी सन्मान सोहाळ्यात व्यक्त केले.त्यांच्या सोबत जेष्ठ मार्गदर्शक पंडीतराव देशमुख,ओंकार सहायता समुहाचे अध्यक्ष मुकूंदराव देशमुख,उपाध्यक्ष नंदकिशोर देशमुख,आर्थिक सल्लागार सुभाषराव देशमुख हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.या प्रसंगी प्रल्हादराव देशमुख,संतोषराव वाघ,नामदेवराव देशमुख,अमोल शं. देशमुख,संजय भि. देशमुख,अमोल भा.देशमुख,शिवाजी देशमुख,बाळू देशमुख इत्यादी शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ओंकार स्वयं सहायता समूहाचे सदस्य संजय दिनकरराव देशमुख, विशाल देशमुख,सोनू देशमुख व सुहास देशमुख यांना अर्थसहाय्याचे धनादेश सुद्धा याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.यापूर्वी समूहाकडून आम्हाला अर्थसहाय्य मिळाल्यामुळे आम्हाला पुढे पाऊल टाकता आले,अशी प्रतिक्रिया अमोल देशमुख,शाम वाघ व संजय देशमुख यांनी दिली.शेतकऱ्यांचा मान सन्मान करण्याचे मोलाचे कार्य ओंकार समुहाने केल्याची भावना नंदकिशोर उल्हामाले यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केली.

युवकांना आर्थिक मदत देऊन सक्षम करण्याचे व निर्व्यसनी ठेवण्याचे कार्य ओंकार समूह करत असल्याचे अस्लम पठाण यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले. ओंकारगीर बाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता.कार्यक्रमासाठी गावातील सर्वच समाजातील जेष्ठ मंडळी व नवयुवक आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रशांत देशमुख यांनी केले.प्रास्ताविक किशोर जाधव यांनी तर आभार प्रदर्शन शंकरराव वाघ यांनी केले. समूहाचे कोषाध्यक्ष किशोर देशमुख व सदस्य पवन देशमुख यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समूहाच्या संचालक मंडळाने व सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले .