निराधारांसह वाटसरू च्या तृष्णा तृप्ती साठी सरसावले लघु व्यावसायिक

निराधारांसह वाटसरू च्या तृष्णा तृप्ती साठी सरसावले लघु व्यावसायिक
शिरपूर :
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून बस स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने वात्सारुंसह वृद्धांचे पाण्यासाठी अत्यंत हाल होत होते याची दखल घेत शिरपूर जैन येथील बँक ऑफ महाराष्ट्र परिसरात असलेल्या लघु व्यावसायिकांनी पदर मोड करून वाटसरू व येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या वयोवृध्द नागरिक श्रावणबाळचे मानधन काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणुन पाणपोई सुरु केली
सदर पाणपोईचे यासाठी लघु व्यावसायिक गजानन गायकवाड, विनोद मारवाडी, गजानन शिंदे, गोपाल मारवाडी, संतोष घाटोळे, संतोष वाढे, अजय इंगळे यांनी पुढाकार घेतला आहे. पाणपोई मुळे पिण्याच्या पाण्याची होणारी भटकंती थांबली आहे. यामुळे परिसरात पाणपोई लावल्यामुळे परिसरातील सर्व नागरीकांनी लघुव्यावसायिकांचे कौतुक केले आहे.