Uncategorized

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध कोण होते ?

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणार्या समाजामध्ये तथागत गोतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धान्ना एका विशीष्ट समाजाच्या चौकटीत अडकउन आम्हाला आजपर्यंत खरा बुद्ध समजुच दिला गेला नाही . जर आम्हाला खरा बुद्ध समजला असता तर आज भारतावर ही वेळच आली नसती. कोण होते बुद्ध ?

1) बुद्धांच पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन गोतम शाक्य …गोतम हे त्यांच आडनाव आणी शाक्य हे त्यांच्या गणाच नाव…कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण !

2 ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस ” कणबी ” असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ….मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणी त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला ” कणबी ” असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला ” कुणबी ” कुणबी म्हणजे आजचा ओबिसी ! मराठा आणी कुणबी एकच . तथागत गोतम बुद्ध कुणबी मराठा होते . त्यांचे वडील आणी परिवार सर्व शेतकरी होते .

3 ) जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते . दैत्यासुर हिरण्यकश्यपुचा मुलगा राजा प्रल्हाद ..प्रल्हादाची दोन मुले ..कपिल आणी विरोचन ! कपिल हा ” सांख्यदर्शन ” चा प्रणेता हे आपण आपल्या आयुर्वेदाच्या पहिल्या वर्ष्याच्या ” पदार्थ विद्न्यान ” हया विषयात दर्शन शास्रात बघितले आणी अभ्यासलेले आहे . दुसरा जो विरोचन आहे ..त्याला ” वृषभदेव असेही म्हणतात .हाच वृषभदेव म्हणजेच ” जैनदर्शन ” प्रणेता..म्हणजेच पहिला तिर्थंकर होय ! वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजेच 24 वे तिर्थंकर !!

4 ) तिसरा जो गण आहे तो कोलियन म्हणजेच आजचा आपला कोळी समाज ! कोळी समाज हा राजा असलेला समाज होता . गोतम बुद्धांची आई देवी महामाया ही कोळी गणाची होती.याचा अर्थ त्यावेळेस कुणबी आणी कोळी यांच्यात आंतरजातीय विवाह होत होते ..म्हणजेच तेव्हा जातीप्रथा नव्हती .

5 ) चौथा गण द्रविड ! दक्षिणेतले सातवाहन , सातकर्णी हे द्रविड गणातिल बुद्धीस्ट राजे होते .

6 ) आणी पाचवा गण गौंड ! महापराक्रमी , दशविद्याप्राप्त , प्राच्यविद्यापंडीत राजा रावण हा गौंड गणातील होता . गौंड म्हणजेच आजचा आमचा आदीवासी समाज . आजही मध्यप्रदेशातील बैतुल आणी विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आमचा आदीवासी समाजाची लोक रावणदहन करत नाहीत . तर तिथ रावणाची आमचा आदीपुरुष म्हणुन पुजा करतात . झारखण्ड राज्यातील आदीवासी समाज राजा रावणाची पुजा करतो .त्याला देव मानतो.

7 ) बुद्धानी प्रचलीत वैदिक व्यवस्थेला छेत देत बुद्धीप्रामाण्यवादी , विद्न्यानवादी , वास्तववादी अश्या विचारांची , धम्माची आणी त्या विचारांचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली.चार आर्यसत्ये , पंचशिल , अष्टांगमार्ग ह्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याच काम केल. याचा परिणाम असा झाला कि बुद्धकाळात भारत ” सोनेकी चिडीया ” म्हणुन प्रसिद्ध होता. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली . स्री-पुरुष भेदाभेद नष्ट झाला . समाज कर्मकांडापासुन दुर गेला , नालंदा ..तक्षशिला ..विक्रमशीला सारखी विश्वविद्यालये स्थापन झाली , जिथ एका वेळी जगातिल 60000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते . योगा शास्र हे बुद्धांची देण आहे . पतंजली हा नालंदा विद्यापिठाचा विद्यार्थी होता . तो योगाभ्यासात पारंगत होता .अर्थशास्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ.अमर्त्य सेन म्हणतात कि बुद्ध काळात भारताचा GDP ( Gross Develpment Product ) हा जगाच्या GDP च्या 33% होता . यावरुन बुद्धकाळात भारत किती प्रगतीशील आणी विकसीत होता याची आपल्याला प्रचिती येइल !

8 ) बुद्ध काळ हा 800 वर्ष्याचा ! सम्राट चंद्रगुप्त हा मौर्य हा पहिला सम्राट तर सम्राट बृहद्रथ मौर्य हा शेवटचा दहावा सम्राट ! त्याची हत्या त्याच्याच सैन्यातील सेनापती पुष्यमित्र शुंग नावाच्या सेनापतीने कपटाने हत्या केली आणी बुद्धसाम्राज्याला उतरती कळा आली . भारतात जातीव्यवस्था , स्री- गुलामगीरी , स्री- दास्यता , क्रमिक असमानता ( Greded Inequality ) आणी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा , रुढी परम्परांची निर्मिती झाली . ह्या गोष्टीन्ना फाटा देण्याच काम भविष्यात लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर , महानुभाव पंथाचे प्रवर्तक संत चक्रधर , वारकरी पंथाचे प्रवर्तक संत नामदेव महाराज ..जगदगुरु तुकोबाराया , छ.शिवाजी महाराज , छ.सम्भाजी महाराज …महात्मा जोतीराव फुले , शाहु महाराज आणी सर्वात शेवटी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकरान्नी केलेले आहे .
9 ) ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील 100 महान महापुरुष्यांची ” विश्वाचे निर्माते ” ( Makers Of The Universe ) म्हणुन एक यादी जाहीर केली . त्यात पहिली चार नाव भारतीय होती ….

A ) तथागत गोतम बुद्ध
B ) वर्धमान महावीर
C ) प्रियदर्शी सम्राट अशोक
D ) विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आम्बेडकर !!*आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे .ज्या ज्या देशान्नी बुद्ध स्विकारला ..ते ते देश आज प्रगतिच्या अत्युच्च शिखरावर विराजमान आहेत मात्र आम्हाला बुद्ध कधी समजुच दिला नाही आणी आम्हीही कधी बुद्धाला समजुनच घेतल नाही . जगाला शांतीचा आणी क्रांतीचा संदेश देण्यार्या ह्या महामानवास ..विश्वनिर्मात्यास कोटी कोटी प्रणाम !*

जय भारत !!

Related Articles

Back to top button
Don`t copy text!