Uncategorized

करंजी सेवा सहकारी सोसायटी निवड बिनविरोध

शिरपूर (प्रतिनिधी)
दि 20 मे :करंजी सेवा सहकारी सोसायटी ची 13 सदस्यांची बिनविरोध निवड होऊन .अध्यक्ष, उपाध्यक्ष ची निवड दि 19 मे रोजी करण्यात आली असून जय हो बळीराजा व स्व अरुण बाबा मित्रमंडळ पॅनल चेअध्यक्षपदी लक्ष्मण खाडे तर उपाध्यक्ष पदी राजू मुठाळ यांची निवड करण्यात आली तर सदश्यांमध्ये माजी सभापती सुरेश शिंदे, माजी.जी.प.सदष्य गणेश उंडाळ, प्रकाश लहाने, विमल लहाने, लक्ष्मी उंडाळ, आश्रू विढोळे, नारायण लहाने, मोहन खाडे, विनोद लहाने, आश्रू शेजोळ, अरविंद खिल्लारे , व भारतीय जनता पार्टी,जनविकास आघाडी,वंचित बहुजन आघाडी या सेवा सहकारी सोसायटी सदशयांनी बिनविरोध समर्थन केले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या सर्व मित्रमंडळ पदाधिकारी उपस्थित होते. या सेवा सहकारी सोसायटीमध्ये सर्व शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण खाडे, उपाध्यक्ष राजू मुठाळ, जय हो बळीराजा पॅनल चे राजेंद्र लहाने यांनी केले. यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!