Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

प्रतिनिधी:- शिरपूर
दिनांक 06/06/2021 रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक दिन म्हणून शिरपूर जैन येथील संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्या वतीने स्थानिक बस स्थानक चौक येथे साजरा करण्यात आला याप्रसंगी आज ६ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक बस स्थानक परिसरात लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे पुजन आनंद जाधव यांचे चिरंजीव दर्शन राजे जाधव यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शंकरराव वाघ, दिलीप विश्वंभर, आनंद जाधव, संदीप देशमुख, किशोर देशमुख, बाळु प्रल्हादराव देशमुख, गजानन देशमुख, सुखदेव देशमुख, विनायक देशमुख, प्रदीप मनोहरराव देशमुख, गोपाल वाढे, शेख सुलतान, बजरंग देशमुख यांचा सह मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी, गावातील प्रतिष्ठित मंडळी,पत्रकार यांच्यासह नवयुवक उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी कोरोनाच्या नियमावली चे पालन केले, कार्यक्रम वेळी पावसाने जोरदार हजेरी लावत सलामी दिली.
यावेळी मान्यवरांनी छत्रपती बस स्टँड चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैल चित्राचे पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून पूजन केले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .