Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

जांब रोडच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश

चौकशी करा व मगच देयके काढा अशी केली होती मागणी!

राहुलदेव मनवर यांनी शासनास पाठवीले होते निवेदन
मंगरुळपीर:- शहरानजीकच्या सोनखास जांब ग्रामपंचायत हद्दीतील जांब रोडचे पाच कि.मी.चे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर कामाची गुणनियंत्रक पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दि.७ रोजी मुख्य कार्यकारी अभियंता म.रा.ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे (गुणवत्ता नियंत्रक समीती) व कार्यकारी अभियंता वाशीम यांना दिले. तसेच मा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सुचनेवरून जिल्हाधीकारी वाशीम यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता वाशीम यांना दिले आहेत.
मंगरुळपीर शहरालगत असलेल्या जांब रोडचे डांबरीकरण हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन सुरु असुन सदर काम हे पाच कि.मी.अंतराचे आहे. हे रोडचे काम इष्टीमेटनुसार नसुन थातुरमातुर बिले काढण्याच्या ऊद्देशाने सुरु असून दि.२२ मे च्या सध्याकाळी पाऊस सुरु झाला होता या पावसातही डांबरीकरणाचे काम सुरुच होते. तसेच या कामात आॅईलमिश्रीत डांबर टाकुन इस्टिमेटनुसार काम न करता निकृष्ट दर्जाचे काम सुरु असल्याने सदर रोडच्या कामाची गुणनियंत्रक अधिकार्‍यामार्फत तसेच तक्रारकर्ते व ग्रामस्थांचे ऊपस्थीतीतच करावी असे निवेदनात म्हटले होते. तसेच त्याशीवाय देयके काढु नयेत व सदर गैरप्रकारास दोषी असणारांवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री यांचे आदेशाने ग्रामविकास विभागाने पत्र क्र. मु.ग्रा.यो./२०२१/प्र.क्र.३३६/साबा-४ दि.७ रोजी मुख्य कार्यकारी अभियंता म.रा.ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे (गुणवत्ता नियंत्रक समीती) व कार्यकारी अभियंता वाशीम यांना दिले आहे.
सदर निवेदनाची दखल सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री शंभभुराज देसाई, जिल्हाधीकारी वाशीम यांनी सुद्धा घेतली आहे.
निवेदनावर राहुलदेव मनवर, अक्षय राजेंद्र ठाकरे रुग्णसेवक, सागर दिलीप महल्ले प्रहार तालुकाध्यक्ष, शुभम मनवर, सुमित मेटकर, दर्शन वानखडे, शरद सवाई, अजय गवारगुरु यांच्या सह्या आहेत.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .