Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

महिलेची तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सैलानी, दि. १८ (प्रतिनिधी)

__________________________________

येथून जवळच असलेल्या माळवंडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १८ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सौ. पल्लवी गणेश चव्हाण वय २० वर्षे ही महिला तीच्या जान्हवी या तीन वर्षीय मुलीसह घरच्या शेतात गेली होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास या महिलेने आपल्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेतली. या दोन्ही मायलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. पोलीस पाटील संजय चव्हाण यांनी पोलिसांनी या घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. त्यानंतर मृतदेह बाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहेपर्यत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुभाष दुधाळ करीत आहे. आपल्या तीन वर्षीय चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा एवढ्या टोकाचा निर्णय या महिलेेने का घेतला? याबाबत अद्याप निश्चित कारण समोर आले नाही.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .