Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

नागपूर – औरंगाबाद महामार्गावर अपघातात टिप्पर चालक जागीच ठार

टिप्पर व प्रवासी खाजगी प्रवासी बस अपघात

टिप्पर चालक दीपक खुशालराव गवळी

प्रतिनिधी/ शिरपूर दि. १७ मे

      नागपूर – औरंगाबाद महामार्गावरील ग्रामचांडस येथून जवळच असलेल्या फौजी धाब्या जवळ दिनांक १७ मे २०२१ रोजी सकाळी ५ झालेल्या टिप्पर व प्रवासी खाजगी प्रवासी बस अपघात टिप्पर चालक दीपक खुशालराव गवळी रा. चांडस जागीच ठार झाला आहे.तर बसचा चालक गंभीर जखमी आहे.

      मालेगांव कडून मेहकरकडे रेतीने वाहून नेणारा भरधाव टिप्पर क्र. एम.एच.३७ टी ९९२२ चा वाहनावरील ताबा सुटल्याने मेहकर कडून मालेगांव कडे प्रवासी वाहतुक करणारी खाजगी बस क्रं एम ए ४० बीजी  ६००१ ला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात  दोन्ही वाहनाचा समोरील भागाचा चुराडा झाला आहे.

सदर अपघातामध्ये चाडस येथील टिप्पर चालक असलेल्या दीपक खुशालराव गवळी यांचा शिर धडावेगळे झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे.  तर प्रवासी वाहतुक बसचा चालक गंभीर जखमी असून त्याचेवर उपचार सुरु आहेत. अगदी सकाळी ५ च्या सुमारास झालेल्या या अपघातात बस मध्ये असलेले १२ – १४ प्रवासी जखमी असून परस्पर उपचारार्थ भारती झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलिसस्टेशनचे पो.उप.निरीक्षक शरद साठे यांनी घटना स्थळी जावून पंचनामा केला असून पुढील तपास पो.कॉ सरनाईक करीत आहेत.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .