Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

दत्तापूरचे उपसरपंच पत्नीसह अपघातात जागीच ठार

वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिली दुचाकीला धडक19 May 2021

त्या दोघांचे छत्र हरविले

उपसरपंच राजू पवार व त्यांच्या पत्नी शोभा यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांचे मातृछत्र आणि पितृछत्र एकाच वेळी हरविले. नियतीने क्रुरडाव साधत एकाच वेळी आई-वडिलांचा डोक्यावरील हात काढुन घेत या दोघांना पोरके केले. या दोन चिमुरड्यांकडे पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रृ दाटले होते.

सिंदखेड राजा, दि. १८ (प्रतिनिधी)

__________________________________

तालुक्यातील दत्तापूर येथील उपसरपंच राजू सोनलाल पवार आणि त्यांच्या पत्नी शोभा हे दोघे अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जाफराबाद जवळील चिंचोली येथे मंगळवार, १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

राजू पवार वय ३५ व त्यांच्या पत्नी शोभा पवार वय ३० हे दाम्पत्य मोटार सायकलने एका लग्न समारंभासाठी भोकरदनकडे जात होते. जाफराबाद जवळील चिंचोंली जवळ समोरुन येणाऱ्या रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे पती, पत्नी गंभीर जखमी झाले.

धडक एवढी जबर होती की राजू पवार यांनी डोक्यात घातलेल्या हेल्मेटचा चुरा होऊन त्यांच्या डोक्यात जबर मार लागला. गंभीर जखमी झालेले हे दोघेही गतप्राण झाले. या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पंचनामा व इतर कायदेशीर कारवाई पूर्ण केली. जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. राजू पवार हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झाले आणि त्यानंतर त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाली होती. या अपघाताचे वृत्त दत्तापूर गावात पोहचताच गावात एकच शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई – वडिल, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .