Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

तर….. खा शरदचंद्र पवार भुमिहीन लोकांच्या न्याय हकका साठी सरकारला पत्र का लिहत नाही

मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांचा सवाल

हाॅटेल, रेसटाॅरंट, बार, यांच्या साठी पवार साहेब यांनी सरकारला पत्र लिहिले परंतु भुमीहिनांचा प्रश्न गंभीर असतांना त्याकडे दुर्लक्ष केले (वाशिम) :मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे वतीने राज्यातील अनुसूचित जाती/जमातीच्या भुमिहीन बेघर लोकांचा विषय घेऊन भाई जगदिश कुमार ईगळे यांनी सतत शासन, प्रशासन दरबारी आंदोलनातमक भुमिका घेऊन पाठपुरावा केला आणि करित आहेत दि, २०;३;२०२१रोजी मुंबई येथील खा शरदचंद्र पवार साहेब यांच्या सिल्वर आोक बंगल्यावर आंदोलन आयोजित केले होते परंतु गाव देवी पोलीस ठाण्यातून आंदोलनाचा परवानगी नाकारली होती,, पुढे पवार साहेब यांची तब्बेत बिघडल्यामुळे आंदोलन शिथिल केले होते सदर आंदोलनाची दखल घेऊन पवार साहेब यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला पत्र लिहून निर्देश देने अपेक्षित असतांना त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत व्यक्त केली असून पवार साहेब यांनी हाॅटेल, रेसटाॅरंट, बीयर बार यांच्या मालकाची दखल घेऊन सरकारला पत्र लिहिले भुमिहीन लोकांच्या न्याय हकका साठी पवार साहेब यांनी सरकारला पत्र का❓ लिहिले नाही याचा जबाब विचारण्यासाठी संघटनेचे वतीने पुन्हा आंदोलन आयोजित करावे लागणार का❓ असा प्रश्न मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमुद केला आहे पुढे प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे की हाॅटेल, रेसटाॅरंट, चया मालकाकडून जेव्हडा कर मिळतो त्यापेक्षा जास्त भुमिहीन लोकांच्या कब्जात असलेल्या जमीनी पिकवून सरकारला अन्न धान्य पुरविण्यात येते परंतु सदर जमीनी भुमिहीन लोकांच्या नावावर नसल्याने पेरणी करतांना अडचणी निर्माण होत असल्याने खा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर आोक बंगल्यावर आंदोलन आयोजित केले होते परंतु या कडे लक्ष देत नसल्याने अनुसूचित जाती जमाती भुमिहीन लोकांच्या मनात खा शरदचंद्र पवार साहेब यांच्या बद्दल ऱोष निर्माण होत असल्याचे मत प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे ज्या प्रमाणे हाॅटेल रेसटाॅरंट मालकाची दखल पवार साहेब यांनी घेतली आहे तशीच दखल भुमिहीन बेघर लोकांच्या न्याय हकका साठी पवार साहेब यांनी घ्यावी अन्यथा पुन्हा आंदोलन आयोजित करण्यात येईल असा इशारा मानवी हक्क सुरक्षा दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार ईगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिला आहे

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .