Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

ऑनलाईन वेबिनार मध्ये नाबार्ड व वित्तीय साक्षरता या विषयी मार्गदर्शन

वाशिम जिल्ह्यात क्रिसील फाउंडेशन चा उपक्रम

शिरपूर – भारतीय रिझर्व बँक , स्टेट बँक ,व नाबार्ड च्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या सहकार्याने वाशिम जिल्ह्यामधील पाच तालुक्या मध्ये आर्थिक साक्षरतेसाठी मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र गेल्या तीन वर्षांपासून घरगुती अर्थसंकल्प बनवने बचत व गुंतवणूक कर्ज व क्रेडिट विमा पेंशन व शासकीय योजनांची माहीती व प्रशिक्षण कार्य क्षेत्रावर जाऊन देत आहे मागील काही दिवसा पासून जिल्ह्यातील वाढत्या कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता सर्व केंद्राचे क्षेत्रकार्य थांबवले आहे अशा वेळेस डिजिटल माध्यमाचा वापर करून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहेत .दि .3.5.2021 रोजी मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र अंतर्गत नाबार्ड व मनीवाइज केंद्र यांची भुमिका, वित्तीय साक्षरता मध्ये नाबार्ड भूमिका , पीक अर्ज ,व इतर सेवा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्ड चे जिल्हा विकास अधिकारी मा. विजय खंडरे सर होते , यावेळी वेबिनार चे प्रस्तावित मनिवाइज चे जिल्हा समन्वयक मा. सत्यपाल चक्रे सर यांनी केले. यामध्ये त्यांनी वेबिनार आयोजनाचे निमित्त सांगितले याच बरोबर वित्तीय साक्षरता मध्ये नाबार्ड ची भूमिका याविषयी माहिती दिली. सदर वेबिनार मध्ये प्रमुख मार्गदर्शक विजय खंडरे यांनी शेतकरी उत्पादक गट , दुग्ध व्यवसाय, पीक कर्ज , हेक्टरी कीती मिळाले पाहीजेत तसेच स्वयंसहाय्यता समूह व सोबतच आर्थिक साक्षरता मध्ये नाबार्ड ची भूमिका विषयी सविस्तर रित्या मार्गदर्शन केले यावेळी सहभागी यांनी वेबिनार मध्ये प्रश्न विचारून त्यांचे समाधान सुद्धा केले. यावेळी वेबिनार ला शंभर हुन अधिक लोकांचा सहभाग होता यामधे ग्रामीण वित्तीय सल्लागार . मनीवाइज ग्राम समीती सदस्य. ग्राम शक्ती सखी तसेच शेतकरी यांचा समावेश होता वेबीनार यशस्वी करण्यासाठी सर्व केंद्र व्यवस्थापक व क्षेत्र समन्वयक यांनी परिश्रम घेतले या वेबिनार मध्ये कोविड 19 आजारा विषयी सुद्धा लोकां मध्ये जनजागृती म्हणून लोकांना मास्क चा वापर करणे, आवश्यकता असेल तेंव्हा च घराबाहेर पडणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात निर्जंतुक करिता साबण व सॅनिटायझर चा वापर करणे ,खोकताना किंव्हा शिकतांना रुमाल चा वापर करणे आदी विषयी माहिती देण्यात आली आहे. सदर वेबीनार चे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर क्रिसील फाउंडेशन चे राज्य समन्वयक
शक्ती भिसे , मनिवाइज चे वाशिम जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्यां मार्गदर्शनाखाली करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन माधवी सरकटे तर आभार किशोर चक्रनारायण यांनी मानले .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .