Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

ऑनलाइन वेबिनार चे आयोजन मनीवाइज सेंटर चा उपक्रम

शिरपूर – भारतीय रिझर्व बँक ,स्टेट बँक , व नाबार्ड यांच्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन यांच्या सहकार्याने वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्या मधे वित्तीय साक्षरता कार्यक्रम चालु आहे कोरोना महामारी मध्ये सर्व टीम कार्यरत आहे,कोविड 19 च्या या काळात मनीवाइज सेंटर मालेगांव व पोस्ट ऑफीस शिरपूर यांच्या संयुक्त विधमाने ऑनलाइन वेबिनार दि. 18 मे 2021 रोजी घेण्यात आला.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक डी.के. सरनाईक उप डाकपाल शिरपूर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले , प्रस्ताविक मध्ये त्यांनी ऑनलाइन वेबिनार चे उद्देश सांगितले वित्तीय साक्षरता बरोबरच बँक सेवा सुविधा पोस्ट सेवा सुविधा तसेच शासकीय योजनांची माहीती व वेगवेगळ्या विभागातील योजनांची माहिती व्हावी याकरिता अशा वेबिनार चे आयोजन करण्यात येत आहे असे त्यांनी म्हटले . प्रमुख मार्गदर्शक डी.के सरनाईक यांनी पोस्ट ऑफीस च्या माध्यमातून चालु असलेल्या सेवा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवा संदर्भात मार्गदर्शन केले राष्ट्रीय कृत बँक मधील पैशाची देवान घेवान आपण आपल्याच गावामधे करू शकतो ज्या व्यक्ती कडे स्क्रीन टच मोबाईल आहेत अशा व्यक्ती नी IPPB हे ॲप मोबाईल मधे डाऊनलोड करून पोस्ट ऑफीस च्या सर्व सेवाची देवान घेवान करू शकतो तसेच मनीवाइज सेंटर नी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्या बद्दल शुभेच्छा देतो व धन्यवाद मानतो या वेबीनार ला ग्रामशक्ती सखी , ग्रामीण वित्तीय सल्लागार , तसेच गावातील व्यक्ती सहभागी होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनोद जाधव व आभार परमेश्वर साबळे यांनी मानले. सदर वेबिनार चे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर , नाबार्ड चे सहाय्यक व्यवस्थापक शंकर कोकणवाड , क्रिसील फाउंडेशन चे राज्य व्यवस्थापक शक्ती भिसे मनिवाइज जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .