Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

शिरपूर ग्रामपंचायत द्वारे केला जातोय अशुद्ध पाणी पुरवठा

राष्ट्रीय पेयजल योजनेवर शासनाचे पाच कोटी रुपये खर्च केल्यानंतरही गावकऱ्यांच्या नशिबी अशुद्ध पाणी

ग्रामपंचायतने केली नाही नळ योजनेच्या पाण्याच्या प्रतवारीत कोणतीच सुधारणा

प्रतिनिधी/ शिरपूर :

       मागील काही महिन्यांपासून गावकऱ्यांना ग्रा.प.मार्फत सुरु असलेल्या नळ योजनेच्या पाण्यात कचरा, घाण, पिवळसर पाणी येण्याच्या प्रकारात वाढ झाली असून हि बाब ग्रा.प.च्या निदर्शनात येत नसल्याने किंवा माहित असूनही माहित नसल्याचे सोंग घेतलेले असल्याने त्यांची झोप मोड करण्याचे काम शिरपूर येथील नागरिक किशोर प्रकाशराव देशमुख यांच्या सह काही नागरिक यांनी दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी तक्रार देवून केली आहे, .

                     तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे कि, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतने गावातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवणे, हे संबंधित ग्रा.पं.चे कर्तव्य असते. तर नागरिकांचा तो अधिकार असतो. परंतू शिरपूर गावात नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नाही. उलट शिरपूर ग्रामपंचायत मार्फत जो पाणी पुरवठा करण्यात येतो. ते नळ योजनेचे पाणी अशुद्ध असते. गावातील जागरुक नागरिकांनी ग्रा.पं.मार्फत केला जाणारा पाणी पुरवठा हा अशुद्ध स्वरूपाचा असल्याचे वेळोवेळी संबंधितांच्या लक्षात आणून दिले आहे. परंतू ग्रामपंचायतने नळ योजनेच्या पाण्याच्या प्रतवारीत कोणतीच सुधारणा केली नसल्याचे निदर्शनास येत आहे. नळयोजनेच्या पाण्याची प्रयोग शाळेकडून ग्रामपंचायतने तपासणी करुन आणली असेल, तर प्रयोगशाळेने नळ योजनेच्या पाण्याच्या प्रतवारी बाबत दिलेला अहवाल जनतेसमोर मांडावा, असे आवाहन तक्रार दराने केले आहे.

                                तसेच तक्रारीत पुढे म्हटले आहे कि, सध्याच्या परिस्थितीत गावातील नळाचे पाणी वापरणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट प्राणघातक ठरली असताना ग्रा.पं. अशुद्ध पाण्याचा  पुरवठा करुन जनतेच्या जीवाशी खेळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंचवीस हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये नागरिकांना ग्रा.पं. पिण्यायोग्य पाणी पुरवठा करण्यात सपशेल अयशस्वी ठरत आहे. अशा अशुद्ध स्वरूपाच्या पाण्यामुळे गावातील लोक ताप, मलेरिया, टायफाईड, जुलाब सारख्या आजाराने त्रस्त झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत गावातील कोणताही दवाखाना रिकामा नाही. अशावेळी दवाखान्यात गेलेल्या पेशंटना कोरोनाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. असे झाले तर शिरपूरचे हॉटस्पाॕट मध्ये रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. अशाप्रकारे  गावकर्यांच्या जीवनाशी खेळण्याचा ग्रा.पं.ला कोणताच अधिकार नाही. शिरपूर मधील वार्ड नंबर 1, 2, 3, 4 या वार्डातील काही ठिकाणी अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पाच कोटी रुपये खर्च केल्यानंतरही जर गावातील नागरिकांना शुद्ध पाणीही मिळत नाही. हा फार दुर्दैवी प्रकार आहे. तक्रारदाराने इशारा दिला आहे कि, ग्रा.पं.ने पुढील 2 आठवड्यात अशुद्ध पाणी पुरवठ्या मागील कारणे शोधावी आणि गावातील लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा कसा होईल याकडे लक्ष द्यावे. अन्यथा अशुद्ध पाण्याच्या बॉटलची माळ ग्रामपंचायत च्या गेट ला आटकून अदोलन करण्यात येईल. या  

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .