Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

शक्य त्या सर्वांना लस द्या -दिल्ली हायकोर्ट

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे लस वाया घालवण्यापेक्षा शक्य असेल त्या सर्वांना लस द्या, असे केंद्र सरकारला सांगितले. देशात ११ एप्रिलपर्यंत १० कोटी ३४ लाख डोसपैकी सुमारे ४४ लाख ७८ हजार डोस वाया गेल्याचे आरटीआय अर्जातून समोर आले आहे. लस वाया जाण्याचे हे प्रमाण प्रचंड असल्याचे न्यायमूर्ती विपिन संघवी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने नमूद केले. कोरोनाचा संसर्ग वय बघून होत नाही. या दुसऱ्या लाटेत तर युवा वर्गाला संसर्गाचा धोका अधिक आहे. असे असताना तुम्ही लसीकरण करताना वयाची अट कशाला घालत आहात. कृपया तुम्हाला शक्य असेल त्या सर्वांना लस द्या. तो १६ वर्षांचा असो किंव ६० वर्षांचा, प्रत्येकाला लसीची गरज आहे. दिवसाअखेरीस लसीच्या कुपीत काही डोस शिल्लक असतील तर ते वयाची अट न पाळता दिले गेले पाहिजे, असे न्यायालय म्हणाले.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .