Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धन महत्त्वाचे : नंदकिशोर वनस्कर

औचित्य; जागतिक वसुंधरा दिनाचे

मुंगळा प्रतिनिधी
वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता अाहे. अन्यथा ही वसुंधरा आपल्याला कधीही क्षमा करणार नाही. या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण प्रेमींसोबतच सर्वसामान्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी संकल्प करून तो प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा, त्यासाठी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धन महत्त्वाचे असे आवाहन नेहरु युवा बहुउदेशीय मंडळ मुंगळा चे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर यांनी केले आहे.
वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी नंदकिशोर वनस्कर हे आपल्या नेहरु युवा केंद्र वाशीम, भारत सरकारशी सलग्नींत – नेहरु युवा बहुउदेशीय मंडळ मुंगळा या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष रोपण करण्यात येत आहे. गावातील नागरिक सुद्धा वृक्षारोपण करण्यात आपला सहभाग दर्शवतात. दर वर्षी वृक्ष लागवड व संगोपन करत आहेत. व नागरिक, युवकांना आपल्या दारी एक तरी वृक्ष लावण्याचे आव्हान करतात.
सध्याच्या परिस्थितीत पाहता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. वृक्षांची संख्या अशीच कमी होत गेली तर पृथ्वीवर प्रदुषणाचे ढग जमा होतील. परिणामी ओझनच्या पातळीला धोका पोहचेल त्यातून अनेक आजाराच्या समस्या तयार होतीलं. वसुंधरेच्या स्वरक्षणार्थ आपण सर्वांनी जागृत असलं पाहिजे. त्यासाठी शक्य होईल तितकी झाडे लावा. प्लास्टिकचा वापर टाळावा. आपलं वातावरण हे स्वच्छता मुक्त झाले पाहिजे याची आपण काळजी घ्या. असे आवाहन वसुंधरा दिनानिमित्त मुंगळा ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा युवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर यांनी केले आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .