Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

गटई कामगारांना पाच हजार मानधन देण्याची चर्मकार विकास संघाची मागणी….

ACTIVE POLICE TIMES /MALEGAON
प्रविण घोडे – तिवळी सर्कल प्रतिनिधी
मो. ९०९६५५५२९२
दि. २२/०४/२०२१

हातावर पोट असणार्या रस्त्याच्या कडेला बसून उन,वारा,पाऊस याची पर्वा न करता गटई काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या कष्टकरी गटई कामगारांना आर्थिक मदत प्रति रु-५०००/-(पाच हजार ) तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर यांनी शासनाला दिले.
शासनाने आत्ताच कोरोना अपातकालीन ताळेबंदी परिस्थितीत फेरीवाला, रिक्षा परवानाधारक, घरेलु कामगार, बांधकाम कामगार यांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. परंतू कष्टकरी गटई कामगार शासनाच्या मदती पासुन वंचित राहिला असून गटई कामगारावर अन्याय झालेला आहे.
मागील एक वर्षापासुन मा.मुख्यंमत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे आर्थिक मदती संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता. कोरोना अपातकालीन परिस्थितीत गटई कामगार खर्या अर्थाने प्रभावित झाला असुन या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असतांना शासनाने फक्त मदतीचे आश्वासन दिले. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून गटई कामगारांना अधिकृत पीच परवाना , गटई स्टाँल देऊन संरक्षण दिलेले आहे.महाराष्ट्रात गटई कामगार एक लाखापेक्षा जास्त असुन सर्व कुटुंबांची उपासमारी होत असतांना शासनाने मदत न करणे अन्यायकारक आहे.
तरी वरील परिस्थितीचा गांर्भीयाने विचार करुन तात्काळ मदत जाहीर करावी हि नम्र विनंती. अन्यथा न्यायहक्कांकरीता कष्टकरी गटई कामगार व कुटुंबांला रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल.
PRAVIN GHODE / MALEGAON

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .