Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित व कुटुंबातील सदस्यांनी कोरोना वर केली मात.

खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा दिला सल्ला.
घाबरून न जाण्याचे केले अवाहन

प्रतिनिधी.औरंगाबाद
(संभाजीनगर) येथील समाजसेवक येथील घाटी रुग्णालयात नेहमी अहोरात्र गोरगरीबांसाठि झटतात.गोरगरिबांच्या मदतीला धाऊन जातात पण याच समाजसेवकाला औरंगाबाद जिल्ह्यात बेड उपलब्ध न झाल्याने समाजसेवक गजानन क्षिरसागर व डॉ जितेंद्र वानखेडे यांनी पहूर ग्रामीण रुग्णालय येथे रात्री ४ वाजता उपचार सुरू केले .तरुण तडफदार समाजसेवक सुमित पंडित वय २८ व त्यांची पत्नी पूजा पंडित वय २३,मुलगी लक्ष्मी पंडित वय ६, मुलगा राम ३ ,आई मीराबाई पंडित ३९, वडील देविदास पंडित वय ४८,यांना कोरोनाची बाधा झाली होती ते औरंगाबाद व सिल्लोड येथे बेड उपलब्ध न झाल्याने पहूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.सुमित पंडित ह्या स्वतः पाँझिटीव्ह असल्याने त्यांनी कोविड सेंटरमध्ये पत्नी,आई, वडील,आपली दोन लहान मुले यांच्या वय उपचार सुरू होते.ऐवढ असुन ही त्यांनी तेथील इतर रुग्नांना ही धीर व न घाबरण्याचा ही सल्ला दिला व पंडित परीवाराने कोरोनावर आज मात केली आहे.व यशस्वी उपचारानंतर त्यांना आज पुर्ण कुटुंबातील सदस्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली यावेळी कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, सुमित पंडित यांनी डॉक्टर डॉ हर्षल चांदा वैद्यकीय अधिक्षक
डॉ संदिप कुमावत,डॉ संदिप पाटील, डॉ योगेश ढाकरे,पोलीस,पत्रकार यांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला.व पहुर वासियांचे उपकार मी आयुष्य भर विसरु शकनार नाही अश्या शब्दांत ते भावुक झाले होते.

पहूर येथे उपचारासाठी दाखल सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडीत साठी सरसावले पहुर वासीयांचे मदतीचे हात
जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागोराव चव्‍हाण, पोलीस निरीक्षक राहुल खताळ,डॉ जितेंद्र वानखेडे,शंकर जाधव,उपसरपंच राजू जाधव, पेठ उपसरपंच शामराव सावळे, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती प्रदीप लोढा,एड एस आर पाटील, भाजपा अल्पसंख्यांक अध्यक्ष सलीम शेख, भाजपा ओबीसी सेल तालुका अध्यक्ष वासुदेव घोंगडे, अबू तडवी हेमंत जोशी,अमोल पवार,चेतन रोकडे, ईश्वर चोरडिया,गजानन घुगरे,पुनमचंद वर्मा,माणुसकी ग्रुपचे जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर,

उपचार घेतले आता ठीक झालो घाबरु नका करोनाला हरवता येते

दि.१५ एप्रील ला आई वडिलांना जास्त त्रास होत असल्याने मी रात्री सिल्लोड औरंगाबाद रुग्णालयात घेवुन गेलो होतो पण बेड न मीळाल्याने पहुर ग्रामीण रुग्णालयात रात्री ०४:२० वा दाखल झालो डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी कोरोनाची चाचणी केली असता आम्ही पुर्ण परीवार पाँझिटिव्ह आलो होता.माझे लहान मुले पण पाँझिटिव्ह आल्याने एकाच कुटुंबातील ६ जण पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आम्ही खुप घाबरलो होतो.परंतु डॉक्टर जितेंद्र वानखेडे यांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार आणि सकारात्मक विचार ठेवले तर अधिक वेगाने कोरोनातून बरे होता येते हे मी स्वतःअनुभवले

——-समाजसेवक सुमित पंडित सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थापक अध्यक्ष माणुसकी ग्रुप

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .