Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

ओमेगा-३, मल्टीव्हिटॅमिन्सच्या सेवनामुळे कोरोनाचा धोका कमी

नवी दिल्ली : मल्टीव्हिटॅमिन्स, ओमेगा-३ आणि प्रोबायोटिक्स किंवा ड जीवनसत्व यांच्या आहारातील समावेशामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. क जीवनसत्व, झिंक किंवा लसूण यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यास मदत होत असल्याचा दावा चुकीचा असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिका, ब्रिटन आणि स्वीडनमध्ये गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लोकांमधील कोविड-१९ लक्षणांचा अभ्यास करण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले होते. आहारातील कोणत्या पूरक घटकांमुळे कोरोना संसर्गाची शक्यता कमी होते याची माहिती या ॲपच्या माध्यमातून घेण्यात येत होती. ब्रिटनमधील हे ॲप वापरणाऱ्या ३ लाख ७२ हजार ७२० युजर्सकडील माहितीचे संशोधकांनी विश्लेषण केले असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, मल्टीव्हिटॅमिन्स, ओमेगा-३ आणि प्रोबायोटिक्स किंवा ड जीवनसत्व यांचे नियमित सेवन करणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक होते. हे ॲप वापरणाऱ्या युजर्सपैकी ६७ टक्के महिला होत्या. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी असण्याचा हा दावा महिलांच्या बाबतीत अधिक ठळकपणे लागू होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली असली तरी ती केवळ निरीक्षणांवर आधारित आहे. आहारातील पोषक द्रव्यांनुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी अधिक असण्यामागील नेमके कारण यातून स्पष्ट होत नसल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. हे ॲप वापरणाऱ्या सुमारे पावणेचार लाख युजर्सपैकी पावणेदोन लाख युजर्सने नियमित पूरक आहार घेतला तर सुमारे २ लाख युजर्सने तो घेतला नव्हता. न्युट्रीशन प्रिव्हेंशन ॲण्ड हेल्थ नामक वैद्यकीय नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .