Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

आयपीएलच्या सट्ट्यातील मुख्य सुत्रधाराला अटक

अमरावती गुन्हे शाखेची कारवाई, सट्टेबाजारात खळबळ

वाशीम, दि. २० (प्रतिनिधी)

_______________________________

अमरावती येथे बडनेरा मार्गावरील एका हॉटेलमध्ये वाशीम येथील रहिवाशी असलेल्या चार बुकींना दोन दिवसांपूर्वी अमरावती स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकने अटक केली होती. त्यानंतर पुन्हा आता आयपीएल सट्टयातील मुख्य सुत्रधार दिलीप हेडा यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे सट्टेबाजारात खळबळ उडाली आहे.

सद्या आयपीएल क्रिकेट स्पर्धांचा हंगाम जोरात सुरु आहे. राज्यभर सटोरियांसाठी ही सुवर्णसंधी असते. वाशीम शहरात व संपूर्ण विदर्भात सट्टेबाजार जोरात चालतो. अमरावती येथील बडेनरा अकोला मार्गावरील एका हॉटेलमध्ये सट्टयाचा व्यवहार चालत असल्याच्या माहितीवरुन अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला होता. या छाप्यामध्ये वाशीम येथील कैलास संजय बसंतवाणी, जितेंद्र रामदंचद्र धामाणी, देवेश रामप्रसाद तिवारी, आशिष रमेशचंद्र सोमाणी यांना अटक केली होती. त्यांच्या जवळून ७ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला होता.

या बुकींच्या चौकशी दरम्यान मुख्य सुत्रधाराचे नाव समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी दिलीप हेडा यांना वाशीम येथून अटक केली होती. दिलीप हेडा यांच्या अटकेनंतर संपूर्ण वाशीम शहरात एकच खळबळ उडाली असून अकोला ते बडनेरा मार्गावरील ज्या हॉटेलमध्ये आयपीएल क्रिकेट सट्टा सुरु होता त्या हॉटेल मालकाला सुध्दा या प्रकरणी सहआरोपी करण्यात आले आहे. चारदिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी अमरावती रवीनगर येथील संदीप भुयारकर व धिरज भगत यांना अटक केली होती. या धाग्यावरुन पोलिसांनी वाशीमचा माग काढत येथील पाच जणांना अटक केली आहे. ही कारवाई अमरावती गुन्हे शाखेेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणातील आणखी दोन मुख्य सुत्रधार फरार आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .