Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

अकोला जिल्हा परिषदेचा आदर्श यवतमाळ जिल्हा परिषदेने घ्यावा

डिके दामोधर महासचिव वंचित बहुजन आघाडी

संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर
मो.9503151634

मुळावा प्रतिनिधी-: मागील एक वर्षापासून राज्यासह देशात कोरोना महामारी ने अतिशय भयंकर थैमान घातले असतांना सध्याचा चालू असलेला कोरोनाचा स्ट्रेंथ अतिशय घातक असून यामध्ये मृत्यूचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे अशा भयानक परिस्थितीमध्ये रुग्णांना ऑक्सिजन व बेड विना आपले जीव गमवावे लागत आहेत यामध्ये प्रामुख्याने आरोग्य यंत्रणा व प्रशासन उपाययोजना करण्यात कमी पडत आहेत तेव्हा जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेला आव्हान करतो की वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेल्या अकोला जिल्हा परिषदेने श्रद्धेय नेते प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सुसज्ज असे 50 घाटाचे कोविड हॉस्पिटल उभे करून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेसमोर एक आदर्श निर्माण केला. त्याच धर्तीवर यवतमाळ जिल्हा परिषदेने अकोला जिल्हा परिषदेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर स्वतंत्र असे सुसज्ज कोवीड हॉस्पिटल उभारावे त्याचबरोबर ग्रामीण भागांमध्ये वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा शासकीय इमारती ताब्यात घेऊन ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी कोविड हॉस्पिटल उभे करावे गरज पडल्यास खास बाब म्हणून आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात यावी व जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची प्रचंड होणारी हेळसांड थांबवावी असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते जिल्हा महासचिव डिके दामोधर यांनी केले आहे.

SANDESH KAMBLE

ACTIVE NEWS NETWORK

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .