ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

सॉफ्ट टेनिस 2021 स्पर्धेत मांगुळ झनक येथील अयाति दांदडे ची राष्ट्रीय पातळीवर निवड…

Active New /Gobhani नरेंद्र वि.अंभोरे मो.7875946366 दि.23/03/2021

सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगांव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन, जळगांव द्वारा श्री. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगांव येथे दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजित ७व्या सब ज्युनीअर राज्यस्तरीय व ८व्या सिनिअर राज्यस्तर सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२१, आयोजीत स्पर्धेत मध्ये मांगुळ झनकच्या कु. अयाति अमोल दांदडे हिने उज्जवल यश संपादन करत राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवले आहे.
या स्पर्धेत पुण्यासह जळगाव, मुंबई, बुलढाणा, उस्मानाबाद, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, रायगड, सोलापुर या 10 जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये पुणे संघाकडून मांगुळ झनक येथिल इंजिनिअर तथा सिल्व्हर लीप मेन्स वेअर शोरूम रिसोड चे संचालक श्री. अमोल जनार्दन दांदडे व डॉ. सुषमा दांदडे ह.मु.पुणे यांची मुलगी तथा रिसोड पंचायत समितीचे सदस्य श्री. भुषण विलासराव दांदडे यांची पुतणी कु. अयाति अमोल दांदडे हिने सब-जुनिअर राज्यस्तरीय वैयक्तीक स्पर्धेत सिल्व्हर , सिनिअर राजस्तरीय वैयक्तीक स्पर्धेत सिल्व्हर व डबल्स सिनियर गटात कास्य मेडल घेऊन स्पर्धेत वर्चस्व गाजवले. दि. ४-८ मार्च दरम्यान जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या सिनियर राष्ट्रीय पातळीवर व दि. २१-२६ मार्च या दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय पातळीवर तिची निवड झाली आहे त्यामुळे अयाति दांदडे चे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेने अध्यक्ष सुनील पुर्णपात्रे, सहसचिव रविंद्र सोनावणे,सहसचिव अमोल पाटील जळगाव सचिव दिपक आर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

ती आपल्या यशाचे श्रेय तिचे आई – वडील आणि प्रशिक्षक प्रशांत रणदिवे, ज्ञानेश पाडळे,मदन गोखले, राहुल ससाणे व मार्गदर्शक श्री विल्सन सर यांना देते. #Narendra Ambhore/Gobhani

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .