ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

समतेचे पाईक संत रविदास : उपसरपंच नंदकिशोर वनस्कर

नेहरु युवा केंद्र कार्यालयात संत रविदास जयंती साजरी

वाशिम: नेहरू युवा केंद्र,वाशिम युवा काय॔क्रम व खेळ मंत्रालय दिल्ली भारत सरकार संलग्नीत राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था, वाशिम, नेहरु युवा बहु. मंडळ केकतउमरा, मुंगळा यांचे वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंतीचे आयोजन नेहरु युवा केंद्र, सिव्हील लाईन वाशिम येथे करण्यात आले होते.
या काय॔क्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम प्रमुख अतिथी मुंगळा येथील नवनिर्वाचित उपसरपंच नंकिशोर वनस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अप॔ण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंगळ्याचे उपसरपंच नंदकिशोर वनस्कर यांनी मनोगत व्यक्त करतांना संत रविदास हे समतेचे प्रेरक होते. त्यांनी आपल्या काव्यातून समानता प्रस्थापित करण्यासाठी काय॔ केले. जी आज काळाची गरज आहे. युवकांनी संत रविदासाचे काय॔ समाजात पोहोचण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी वनस्कर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला राजकुमार पडघान, प्रविण पट्टेबहादुर , विनोद पट्टेबहादुर आदींची उपस्थिती होती.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .