ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

शेतक-यांचे हित जोपासणारा व जलव्यवस्थापन करणारा वैभवशाली राजा छत्रपती शिवराय : वैशाली मेश्राम

शिवरायांना अभिवादन

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव रयतेचा, शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला. शेतकरी हितासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिल्या. शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडला. उद्योग व्यवसाय मर्यादीत असतांना देखील शेतक-यांनी आत्महत्या केल्या नाहीत. कारण शिवरायांचे शेती विषयक धोरण. ते त्यांच्या अनेक पत्रातून व आज्ञापत्रातून स्पष्टपने दिसते. शेतक-यांना भेडसावणारा दुष्काळ लक्षात घेता शिवरायांनी त्याकाळात जल व्यवस्थापन करुन गडावर सुध्दा पाणीसाठ्यासाठी कुंड उभारले जे आज सुद्धा पाण्याने तुडुंब भरलेले दिसुन येतात शिवरायांचा आद॔श समोर ठेवून शेतक-यांनी आत्महत्या टाळाव्या व प्रत्येक व्यक्तींनी जल व्यवस्थापन करावे हेच खरे शिवरायांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ती वैशाली खोब्रागडे-मेश्राम यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक व बहु. संस्था वाशिमचे (संलग्नीत नेहरु युवा केंद्र वाशिम, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, दिल्ली) वतीने आयोजित शिवरायांच्या शेतीविषयक धोरणावर व जल व्यवस्थापनावर चर्चासत्र काय॔क्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काय॔क्रमाच्या प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. काय॔क्रमाचे संचालन शितल साठे यांनी तर आभार मिनल मेश्राम यांनी मानले. काय॔क्रमाला सौ. सोमनकुमा खोब्रागडे, इंदुमती भिसे, उर्मिला रोकडे, वर्षा पट्टेबहादुर, निज॔ला राऊत, सुजाता पंडित यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .