ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

शिवजयंती निमित्त महारक्तदान शिबीरामध्ये १०५ जणांचे रक्तदान

राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप यांचा उपक्रम –

तोंडगांव –
सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट असतांना या लढ्यात सर्वच कर्मचारी व प्रशासन योगदान देत आहेत . यातच आपल्या जिल्ह्यात रक्ताचा भरपुर तुटवडा जाणवत आहे . या उद्देशाने दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३ ९ १ जयंतीचे औचित्य साधुन दि .१ ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मौजे तोंडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राजे संभाजी प्रतिष्ठाण द्वारा संचालित राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप च्या महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करुन शिबीरास सुरवात झाली या शिबीरात तोंडगांव , सायखेडा , वाशिम , केकतउमरा , व परिसरातील १०५ युवकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करुन रक्तदान केले त्यामध्ये प्रत्येक रक्तदात्यांना मास्क व प्रमाणपत्र देण्यात आले.
या शिबीरास तोंडगांव मधील राजे संभाजी प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य , सर्व राजकीय नेते , सामाजिक कार्यकर्ते , युवा मंडळी , डॉक्टर मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या शिबीरात जिल्हा रक्तपेढीचे डॉ.कोमल टारपे , सचिन दंडे , सुभाष फुके , सुनिता जाधव , संदिप मोरे , लक्ष्मण काळे , संजय गोडे , शालीनी सावळे , प्राथमिक आरोग्य केंद्र तोंडगांवचे कर्मचारी , शिंदे मामा , बावणे साहेब , डॉ.नसीर साहेब , तसेच राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप च्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले .
ग्रामिण भागातील आजपर्यंतचे सर्वात मोठे रक्तदान शिबीर असल्याचे शासकीय रक्तपेढीच्या वतीने सांगण्यात आले व सर्व रक्तदात्यांचे तसेच राजे संभाजी प्रतिष्ठाणचे आभार मानले व उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक केले .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .