विक्रोळी भागातील बेघर नागरीक शासनाच्या सवार्र्ंसाठी घरे योजनेपासून वंचित हक्काचे घरकुल द्या अन्यथा शासकीय जमिनीवर झोपड्या उभारु –

सौ. सना कुरेशी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने मुलुंड तहसिलदारांना निवेदन
मुंबई – शासनाच्या सर्वासाठी घरे -२०२० योजनेपासून विक्रोळी भागातील बेघर नागरीक अद्यापही वंचित आहेत. योजनेची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे नागरीकांनाा नाईजालाने भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने योजनेची अंमलबजावणी करुन बेघर लोकांना हक्काचा निवारा देण्याच्या मागणीसाठी मानवी हक्क सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीशकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात व मुंबई प्रदेशाध्यक्षा सौ. सना कुरेशी यांच्या नेतृत्वात आणि घरकुलापासून वंचित शेकडो महिलांच्या उपस्थितीत २४ फेब्रुवारी रोजी मुलुंंड तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यासोबतच बेघरांना हक्काचा निवारा न दिल्यास शासनाच्या पडीत जमिनीवर झोपड्या उभारण्यात येतील असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सर्वांसाठी घरे शासनाचं धोरण तर बेघर लोकांचं आजही हक्काच्या घरासाठी का होत आहे मरणं असा सवाल दिलेल्या निवेदनाव्दारे शासनाला विचारण्यात आला आहे. निवेदनात नमूद आहे की, सरकार एकीकडे सर्वासाठी घरे २०२० जाहीर करते. परंतु आजही विक्रोळी भागात राहणार्या लोकांना हक्काचे घर नसल्यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. घराचे भाडे दामदुप्पट होत असल्यामुळे भाडे भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे ज्या लोकांना हक्काचे घर नाही अशा लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीत संकटांना सामोरे जात असतांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. रोजगार बंद झाल्यामुळे पैसे मिळत नाही. अपुर्या मिळणार्या पैशामध्ये मुलांचो शिक्षण, रोजच्या दैनंदीन गरजा आणि बेघर लोकांचा जगण्याचा व राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे या योजनेची अंमलबजावणीच होत नसल्यामुळे गरजवंतांना घराचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीचा विचार करुन विक्रोळी भागातील बेघर नागरीकांना शासनाच्या घरकुलाचा लाभ द्यावा अन्यथा शासनाच्या पडीत जमिनीवर झोपड्या उभारण्यात येतील असा इशारा दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.