ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे हाच संदेश गुरु रविदासांनी दिला -चंद्रप्रकाश देगलूरकर

अँक्टीव न्युज ऊमरखेड तालुका प्रतिनिधी गजानन वानखेडे.मो.९०९६७४६५१८.दिं.२३.०२.२०२१………………….. आपण माणूस आहोत आणि माणुसकीचे सर्व हक्क आणि अधिकार आपणाला मिळाले पाहिजेत, यासाठी आपल्या महामानवांनी संघर्ष केला. त्यामुळे आपले जीवनमान सुधारले आहे पण भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे हाच संदेश गुरु रविदासांनी दिला असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
गुरु रविदास समता सामाजिक विचारमंच, मालेगाव जि. नाशिकच्या वतीने गुरु रविदास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त सामाजिक सप्ताह १५ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आला होता, त्याचा समारोप रविवार दि. २१ फेब्रुवारी रोजी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या व्याख्याना ने करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
हॉटेल मराठा दरबार, स्टेट बँकेसमोर, मालेगाव जि. नाशिक येथे आयोजित या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, जनावरे अन्नासाठी जगत असतात पण माणसाला भाकरीपेक्षा स्वाभिमान व अस्मिता महत्त्वाची आहे. यावर आघात होत असेल व यात आपले जीवनमान आणि आपली अब्रू धोक्यात येत असेल तर त्याविरुद्ध संघर्षासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेला या कामी सहकार्य करावे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम बोर्डे (पत्रकार व युवा प्रदेशाध्यक्ष, अ. भा. गुरु रविदास समता परिषद, बुलढाणा) यांनी गुरु रविदास यांची विज्ञानवादी विचारधारा स्पष्ट केली. प्रा. डॉ. बालकवी लक्ष्मण सुरंजे (मुंबई), लेखक व प्राचार्य झेड. के. पवार (धुळे), इंजि. गणेश पवार (मालेगाव) आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नंदू वाल्मीक डावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रविंद्र अहिरे यांनी केले. समितीचे सचिव रोहित तेली यांनी प्रास्ताविक केले. राजेश राजवंशी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल तेली, अमोल अहिरे, किरण राजवं शी, दिलीप पाथरे, शरद सुरंजे, गणेश पवार, छगन अहिरे, किरण अहिरे, पंकज पवार, राहुल अहिरे, सचिन डामरे, शुभम थोरात, अतुल बर्वे, रजनीकांत मुलझिर, विकास निकम, अतुल जाधव, प्रविण उंडाळे, योगेश बागुल, प्रदिप खरे आदींनी परिश्रम घेतले.#गजानन वानखेडे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .