ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

जिव्हाळा संस्था “नवरत्न 2021” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई येथे उल्लेखनीय अविरत कार्याचा गौरव

संदेश कांबळे
ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर

मुळावा.मो.9503151634

मुळावा प्रतिनिधी:-
इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, मुळावा उमरखेड जि. यवतमाळ महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या कमी कालावधी मध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सामाजिक क्षेत्रा मध्ये मागील 9 वर्षा पासून महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला व बाल विकास , स्वागत स्त्री जन्माचे (लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा ) आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, उपजीविका, जैवविविधता, कृषी व ग्रामविकास, मानवी हक्क, बालहक्क, बेरोजगारी, सिंचन, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियाना च्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील सात तलावातून गाळ उत्खनन करून शेतकरी बांधवाना मोफत गाळ वाटप केला आहे. त्या उत्खनना मुळे आज शेकडो लिटर जल साठा होऊन दुष्काळावर मात करण्यात संस्थेला फार मोठे यश प्राप्त झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात या अभियानात भरीव कार्यामुळे जिव्हाळा संस्था प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तसेच कोरोना ( कोविड 19 ) विषाणूच्या जीवघेण्या महामारीने मागील मार्च २०२० पासून संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहिर केला होता. लॉकडाऊन काळातील परिस्थितीने सर्वत्र वाताहत उद्भवली होती. आशा परिस्थित जीवन जगतांना समाजातील अतिशय गोर गरीब, गरजू, विधवा, दिव्यांग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आदींचे आतोनात हाल होत होते. अशा भयावह परिस्थिती मध्ये जीवाची पर्वा न करता जिव्हाळा संस्थे ने असंख्य कुटुंबाना राशन व किराणा कीट, मास्क व वाटप, जनजागृती, पायदळी जाणाऱ्या मजुरांना नासता, पाणी व जेवण, रक्तदान शिबीर, जिव्हाळ्याची पाठशाला उपक्रमा अंतर्गत शालेय साहित्य वाटप व मोफत शिकवणी वर्ग, जिव्हाळ्याची गोड दिवाळी अतर्गत दिवाळी फराळ वाटप, जिव्हाळा मायेची ऊब या उपक्रमा अतर्गत शेकडो लोकांना ब्लॅंकेट वाटप, अनाथ मुलींच्या शिक्षणा साठी मदत, या सारखे अनेक उपक्रम संस्था अविरत पणे राबवीत आहे. समाजातील सर्व उपेक्षित घटकांसाठी अहोरात्र कार्य करणारी निस्वार्थ संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या सर्व सामाजिक उलेखनीय कार्याची दखल घेऊन हा मानाचां राज्यस्तरीय सन्मान हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली, मुंबई यांच्या वतीने २१ फेब्रवारी २०२१ त्यंच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आदित्य मंगल सभागृह, डोंबिवली मुंबई येथे शासनाचे व प्रशासनाचे सर्व नियम पाळून सुप्रसिद्ध हास्यसम्राट अभिनेते पंढरीनाथ कांबळे (पॅडी), प्रख्यात वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर, अभिनेते प्रणव पिंपळकर, मॉडेल रवी ठाकूर, हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली मुंबई चे संस्थापक समीर चव्हाण, अध्यक्षा प्रियंका कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लता राम मादावार, सल्लागार संगीता अतुल मादावार. स्वयंसेवक विजय राठोड, रोहित अलमुलवार यांना शाल, प्रशस्तीपत्र व सुरेख मानचिन्ह या स्वरुपात “नवरत्न २०२१” जिव्हाळा संस्थेस हा मानाचा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी रश्मी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन समीर चव्हाण यांनी तर आभार प्रियांका कांबळे यांनी केल.

SANDESH KAMBLE

ACTIVE NEWS NETWORK

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .