ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
previous arrow
next arrow
Slider
Uncategorized

जिल्ह्याबाहेर प्रवास करून आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी : जिल्हाधिकारी

वाशीम, दि. २३ (प्रतिनिधी)

_______________________________

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा लवकर शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बाधितांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांची वाढ पाहता गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर प्रवास केलेल्या, विशेषत: ज्या भागामध्ये संसर्ग अधिक वाढला आहे, अशा भागात प्रवास करून आलेल्या सर्व नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांवर लवकर उपचार सुरू होतील व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे, अशा जिल्ह्यात प्रवास करून आलेल्या किंवा वास्तव्य करून आलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:हून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखवणे यासारखी कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, रिसोड तालुक्यातील सवड येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह व कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून याठिकाणी सुद्धा कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .