कळमूला येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कोरोना नियम पाळत केले महाराजांना अभिवादन
✍संदेश कांबळे✍
✍ऍक्टिव्ह न्यूज रिपोर्टर✍मुळावा*
मो.9503151634
मुळावा प्रतिनिधी:-मुळावा येथून जवळच असलेल्या कळमुला येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेऊन गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली ती.मिरवणूक सर्व गावभर फिरून महाराजांच्या पुतळ्या जवळ नेऊन थांबविण्यात आली त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हा जयंती सोहळ्याला कळमुला गावच्या सरपंच प्रणिता बवणे, उपसरपंच अनंता कनवाळे ,पोलिस पाटील सौ.संजीवनीताई लडके,यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परमेश्वर गोरे ,आशीष कनवाळे, अक्षय कनवाळे,
विष्णू कनवाळे, प्रशांत कनवाळे, धीरज कनवाळे देवानंद कनवाळे,प्रकाश काळे यांनी परिश्रम घेतले.
SANDESH KAMBKE
ACTIVE NEWS NETWORK