Uncategorized
अरुण बाबा इंगोले प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

51 रक्तदात्यांनी केले रक्तदान
शिरपूर तारीख 21 फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 जयंतीनिमित्त अरुण बाबा इंगोले प्रतिष्ठान कोठा यांच्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लोकनेते अरुण बाबा इंगोले प्रतिष्ठान आयोजित बापूनगर कोठा येथी जी.प. प्राथमिक शाळा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते .या वेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले .प्रमुख उपस्थिती म्हणून मोहन भाऊ ढवळे, राजू मामा शिंदे, अमोल पाटील गायकवाड व समस्त ग्रामस्थ व खंडाळा सर्कल मधील व बापूगरनगर कोठा येथील शिवभक्त उपस्तीत होते.कांतादेवी डाळे रक्तपेढी वाशिम यांनी रक्तसंकलन केले.