ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

५, १०, १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याबाबत सूचनाच नाहीत!

व्यापार्यांचा सावध पवित्रा: सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा

जिल्हा प्रतिनिधी (वाशीम)

 वाशिम: जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निमार्ण झाला आहे. दरम्यान, या जुन्या नोटा बंद होण्याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्र नसल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१७ मध्ये एक हजार आणि ५०० रुपयांची नोटचलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आणि नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँकांसमोर रांगेत उभे राहावे लागले होते. आता जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्याचे वृत्त सोशल मीडियात झळकत आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा नाही. दुसरीकडे यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये थोडी संभ्रमावस्था असून, काही जण ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत धाव घेत आहेत.

बँकांना सूचना नाहीत!

जुन्या पाच, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात जिल्ह्यातील बँकांना अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. सोशल मीडियात या नोटासंदर्भात वाचण्यात आले; परंतु अधिकृत पत्र किंवा सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे या नोटासंदर्भात तुर्तास तरी काही सांगता येणार नाही. काही नागरिक १०,१०० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करीत आहेत.

व्यापायांकडून नोटांचा स्वीकार!

जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चेने या नोटा अधिक संख्येने बाजारपेठेत येत असल्याचे दिसून येते. काही जण या नोटा बँकेत जमा करीत आहेत तर काही जण विविध प्रकारच्या साहित्य खरेदीत या नोटा वापरत आहेत. व्यापारी मात्र पाच, १० व १०० रुपयांच्या नोटा स्वीकारत असल्याचे वाशिम शहरासह जिल्ह्यात दिसून येते.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .