ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

१७ लाख रुपयाच्या पाइपलाइन मधून एक थेंबही जात नाही!

गौळखेडा येथील प्रकार , प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

शिरपूर

१६ जानेवारी

 शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक १ ग्राम गौळखेडा स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगांतर्गत रिपेअर टू व्हिलेज वॉटर स्कीम या योजनेअंतर्गत शिरपूर ते गौरखेडा अशी १७  लाख रुपय खर्च करून  पाईपलाईन टाकण्यात आली होती. आजमीतिला पाईप लाईन नादुरुस्त झाल्याने पाण्याचा एक थेंबही जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगांतर्गत (रिपेअर टू व्हिलेज वॉटर स्कीम )योजनेअंतर्गत १७ लाख रुपये खर्च करून तत्कालीन सरपंच यांच्या कार्यकालामध्ये शिरपूर ते गौरखेडा जलवाहिनी  टाकण्यात आली होती व कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला होता .परंतु आजमितील  गौळखेडा येथे पाण्याचा ठणठणाट असून एक थेंबही त्या पाइपलाइन मधून जात नाही.

 गावात कुठेही पाणी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना लगतच्या विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे.

प्रशासनाच्यावतीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, सदर योजनेअंतर्गत झालेल्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने जलवाहिनीचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे झाल्याने  जागोजागी लिकीज झाली आहे. अनेक ठिकाणी टाकलेल्या वॉल मधून पाणी लिकेज होत असल्याने  गावापर्यंत पाणी पोहोचतच नसल्याचे गावकऱ्यांच्या वतीने बोलले जात आहे. येथे उन्हाळ्यामध्ये पाण्याचे अत्यन्त दुर्भिक्ष असते मात्र प्रशासनाने वतीने आजपर्यंत पाण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही गावामध्ये संतापाची तीव्र लाट उमटत आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाय योजना कराव्या अशी ग्रामस्तांची मागणी आहे .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .