ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बाबत अद्यापही संभ्रम!

वाशीम शेजारच्या जिल्ह्यातील आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

जिल्हा प्रतिनिधी (वाशीम)

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी पार पडले असुन १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला तेव्हा पासून आजपर्यंत सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख अधिकृतरित्या जाहीर न झाल्याने निवडूण आलेल्या सदस्यामध्ये सरपंच सोडती बाबतचा संत्रम अद्यापही कायम आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीनंतर एक महीन्याच्या आत पुढील प्रक्रिया पार पाडणार असल्याचे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार काही जिल्ह्यातील तालुका व जिल्हा स्तरावरील आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला असुन प्रत्येक तालुक्यात एकुण जागेपैकी एस.सी ,ओबीसी, व सर्वसाधारण प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत, हे जाहीर करुन आरक्षण सोडतामधील पारदर्शकता कायम ठेवली आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र सोडतीबाबतची सविस्तर माहीती देण्यात आली नाही. जिल्ह्यात एकूण १६३ ग्रामपंचायतसाठी निवडणूका पार पडल्या त्यातील ११ ग्रामपंचायत अविरोध आल्या आहेत, उर्वरीत १५२ ग्रामपंचायतसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे नवनिर्वाचीत सदस्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सरपंच पदाची आरक्षण सोडत केव्हा काढणार याबाबत अद्यापही अधिकृत रित्या जाहीर नाही. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करुन सदस्यांचा मनातील संभ्रम दुर करावा अशी मागणी होत आहे

जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत यापुर्वी जिल्हा प्रशासनाने काढली होती. मात्र शासनाच्या निर्णयानंतरही आरक्षण सोडत निवडणूक निकालानंतर काढण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पडून ५ ते६ दिवसाचा कालावधी उलटत आहे मात्र अद्यापही सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे कोणते आरक्षण निघते याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .