शिरपूर पोलिस स्टेशनच्या वतीने वतिने पत्रकारांचा सत्कार

शिरपूर11 जानेवारी
6जावारी ला पत्रकार दिन साजरा करण्यात येतो .यानिमित्त शिरपूर पोलीस स्टेशन च्यवतीने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पत्रकारांचा व इतरही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानल्या जातो समाजाचा आरसा म्हणून सुद्धा पत्रकारितेकडे बघितले जाते .
स्तनिक पोलीस स्टेशनमध्ये दि 7 जानेवारी रोजी शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे यांनी रोजी सर्व पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .यावेळी अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे नवनियुक्त शहर अध्यक्ष गोपाल वाढे, उपाध्यक्ष शेख सुलतान, शशिकांत देशमुख, कैलास भालेराव ,असलम पठाण, गजानन देशमुख, संदीप देशमुख, शंकराव वाघ ,संजय जोशी ,आनंद देशमुख ,विजय धोंगडे ,संदीप गावंडे, या सर्व पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी विविध विषयावर ठाणेदारांनी पत्रकारांशी हितगूज केली .यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकारांचे समाजासाठी बहुमूल्य योगदान आहे.
पोलीस प्रशासन व पत्रकारांचा योग्य समन्वय असणे आवश्यक आहे .यावेळी शिरपूर येथे 15 तारखेला होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणूक बाबत सुद्धा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी नागरिकांनी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडावी असे आव्हान केले .यावेळी पो हे कॉ संतोष पाईकराव ,विजय मोरे,व इतर कर्मचाऱ्यांची ऊपस्तीती होती.
