ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

शिरपूर ग्रा.पं.निवडणूकीत बेरजेच्या राजकारणाचा विजय

सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी ठरला


शिरपूर दि 23 जानेवारी
गजानन देशमुख
दि.१८ रोजी ग्रा.पं.निवडणूकांचे निकाल लागले.१७ सदस्यीय शिरपूर ग्रा.पं.मधे क्रांती पॕनल, जय हो पॕनल व तिसरी आघाडी यांनी 12 जागा जिंकत एकता पॕनलचा दारुण पराभव केला.या निवडणूकीत डॉ.शाम गाभणे व संजय शर्मा यांच्या एकता पॕनलला केवळ ५ जागांवरच समाधान मानावे लागले.अपक्ष व कोऱ्या पाटीच्या युवा उमेदवारांनी या निवडणूकीत उलटफेर घडवून आणला.त्यामुळे ‘अपक्ष व कोऱ्या पाटीचे उमेदवार दणका देणार’ या भाकीतावर शिक्कामोर्तब झाला, हे विशेष!

शिरपूर ग्रामपंचायत ही वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.त्यामुळे शिरपूर ग्रा.पं.च्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहले होते.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या ग्रा.पं.मधे मागील १० वर्षांपासून डॉ.गाभणे गट बहूमत मिळवत आला होता.गेल्यावर्षी झालेल्या जि.प.-पं.स. निवडणूकीत देखील काँग्रेसचे एक जि.प. व दोन पं.स.सदस्य निवडून आले होते.त्या निवडणूकीत डॉ.शाम गाभणे यांचा MGM (माळी,गवळी व मुसलमान) हा फॉर्म्युला प्रचंड यशस्वी ठरला होता.शिवाय भाजपा व शिवसेनेच्या उमेदवारांत मतविभागणी होऊन भाजपा-शिवसेनेचे पानीपत झाले होते.परंतू नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.निवडणूकीत क्रांती पॕनल,जय हो पॕनल व तिसरी आघाडी यांनी एकत्रितपणे १२-५ अशा विक्रमी फरकाने विजय मिळवत जि.प.-पं.स. निवडणूकीतील पराभवाचा हिशोब चुकता केला आहे. ग्रा.पं. निवडणूकीतील विजय हा क्रांती पॕनल, जय हो पॕनल व तिसरी आघाडीने केलेल्या बेरजेच्या राजकारणाचा विजय मानला जात आहे.कारण क्रांती पॕनल, जय हो पॕनल व तिसऱ्या आघाडीचा MMDDG (माळी,मुसलमान,धनगर,देशमुख व गवळी) हा सोशल इंजिनीअरिंगचा पंचसुत्री फॉर्मुला प्रचंड यशस्वी ठरला आणि बेरजेच्या राजकारणाचा विजय झाला आहे.सोशल इंजिनीअरिंगच्या या प्रयोगात सलीम गवळी यांनी आपली मास्टरमाईंडची भुमिका चोखपणे पार पाडली.अगदी नामनिर्देशन छाननी व हरकती घेण्यापासून तर अपक्ष उमेदवार उभे करण्यापर्यंत सलीम गवळी यांनी या निवडणूकीत सर्वांनाच आपल्या राजकीय चातुर्याने चकीत केले. निवडणुकीपूर्वी अपक्ष व कोऱ्या पाटीचे उमेदवार दणका देणार’ असे भाकीत केले होते.निवडणूक निकालानंतर ते भाकीत खरे ठरल्याचे बोलले जात आहे.कारण वार्ड क्र.१,२ व ६ मधे विजयी उमेदवाराच्या लिडपेक्षा अपक्षांनी जास्त मते घेतली आहेत.तर वार्ड क्रः२,३,४ व ६ मधे क्रांती पॕनल, जय हो पॕनल व तिसरी आघाडीने कोऱ्या पाटीच्या युवा उमेदवारांना मैदानात उतरवून उलटफेर घडवून आणला.वार्ड क्रः२ मधून मनिषा संदीप तोटेवार यांनी माजी ग्रा.पं.सदस्या दिपाली सुशांत जाधव यांचा पराभव केला.तर वार्ड क्रः३ मधून पप्पू देशमुख यांनी माजी सरपंच सुशांत जाधव यांना धुळ चारली.वार्ड क्रः४ मधे अशोक कदम यांनी माजी पं.स.सदस्य लक्ष्मण भांदुर्गे यांना पराजीत केले.तर वार्ड क्र.६ मधे ओंकार गाभणे या तरुणाने माजी सरपंच गणेश भालेराव यांना मात दिली. शिरपूर ग्रा.पं.च्या या निवडणूकीत सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी ज्याप्रमाणे नविन राजकीय समीकरणे तयार केली.त्याप्रमाणे ज्यांना जनतेने सत्तेचा जनादेश दिला.त्यांना स्वतःचा विकास बाजूला ठेऊन शिरपूरच्या विकासाची समीकरणे तयार करावी लागणार आहेत.कारण यावेळेस ग्रा.पं. सभागृहात सत्ताधाऱ्यांसमोर एकता पॕनलचे कलीम रेघीवाले,अलिमखाँ पठाण व इंदूताई इरतकर हे अभ्यासू,अनुभवी आणि आक्रमक सदस्य असणार आहेत.ग्रामपंचायतला मिळणाऱ्या निधीचा कोणत्याही नेत्याच्या नव्हे तर शहर विकासासाठी सदूपयोग व्हावा.म्हणून सभागृहात अभ्यासू,अनुभवी व आक्रमक विरोधी पक्ष असणे आवश्यक असतो.अभ्यासू, अनुभवी व आक्रमक ग्रा.पं. सदस्य कलीम रेघीवाले यांची एकता पॕनलने विरोधी पक्षनेता म्हणून निवड करावी,अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.असे केल्यास शहर विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर अथवा अपहार होणार नाही, असे जनतेतून बोलले जात आहे.

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .