शिरपूर ग्रामपंचायत मधे घडून आली क्रांती!

एकता पॕनलचा दारुण पराभव
आता सरपंचपदाच्या रोस्टरकडे सर्वांचेच लक्ष
शिरपूर ता 18 जानेवारी
दि.१५ रोजी झालेल्या ग्रा.पं. निवडणूकीचा काल दि.१८ रोजी निकाल लागला.१७ सदस्यीय शिरपूर ग्रा.पं.मधे क्रांती पॕनल,जय हो पॕनल आणि तिसरी आघाडी यांनी अनुक्रमे प्रत्येकी ७,३,२ जागा जिंकून एकता पॕनलचा दारुण पराभव केला.विजयी उमेदवार व जनतेचे आता दि.21 नंतर निघणाऱ्या सरपंचपदाच्या रोस्टरकडे लक्ष लागून राहले आहे.
वार्ड क्र.१ मधून एकता पॕनलचे कलीम रेघीवाले,इंदूताई ईरतकर व सिंधू कांबळे विजयी झाले आहेत.तर वार्ड क्रः२ मधून जय हो पॕनलच्या अस्लम परसूवाले,मनिषा तोटेवार आणि सलमा रेघीवाले यांनी विजय खेचून आणला.वार्ड क्रः३ मधून तिसऱ्या आघाडीचे पप्पू उर्फ शंकर देशमुख व मनिषा मानवतकर विजयी झाले आहेत.तर वार्ड क्र.४ मधून क्रांती पॕनलच्या कल्पना अंभोरे,पंजाबराव देशमुख व अशोक कदम यांना मतदारांनी कौल दिला आहे.वार्ड क्रः५ मधून एकता पॕनलचे अलीमखाँ पठाण आणि मो.अलिम शे.रसूल व क्रांती पॕनलच्या दिपाली खोरणे यांनी विजयश्री खेचून आणला आहे.वार्ड क्रः६ ने सर्वांचे अंदाज चूकवत धक्कादायक निकाल दिला आहे.या वार्डातून क्रांती पॕनलचे ओंकार गाभणे,राजकन्या अढागळे व शमीमबी सब्बुरखाँ यांनी चकीत करणारा विजय नोंदवला आहे. सरपंचपदासाठी एससी प्रवर्गाचे रोस्टर निघाल्यास क्रांती पॕनलच्या राजकन्या अढागळे आरामात विराजमान होतील,असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
मागील १० वर्षांपासून ग्रा.पं.मधे बहूमत प्राप्त करणाऱ्या गाभणे व शर्मा पॕनलचा क्रांती पॕनल,जय हो पॕनल व तिसरी आघाडी यांनी एकत्रीतपणे १२-५ असा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. त्यामुळे वाशीम जि.प.चे उपाध्यक्ष तथा एकता पॕनलचे अध्यक्ष डॉ.शाम गाभणे यांना आत्मपरीक्षण करुन पॕनलची भुमिका व धोरण यामधे सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.



