ANN WEB SERVICES
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Slider
Uncategorized

शिरपूर ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत संपन्न !

४२ उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद

ऐकून ७४.१८ टक्के मतदान

शिरपूर

मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत  शिरपूर जैन  येथे दिनांक १५ जानेवारी रोजी  शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.

मागील एक वर्षापासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे  ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या होत्या मात्र राज्यांमध्ये १५ जानेवारी रोजी निवडणूक जाहीर झाल्या.

 शिरपूर जैन मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून  गणली जाते. एकूण सहा प्रभागातून ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .त्यापकी१७  ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार आहेत. सहा प्रभागासाठी १४ बूथवर मतदान प्रक्रिया पार पडली .

दिनांक १५ जानेवारी रोजी  सकाळपासूनच मतदारांचा उस्फुर्त  प्रतिसाद मतदान केंद्रावर  दिसत होता.येथे एकूण  १२ हजार ६४५ मतदार आहेत. त्यापैकी  पुरुष मतदार ६७४४ तर महिला मतदार ५९०१ आहेत . ऐकून ९४१० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला ऐकून  ७४.४१ टक्के मतदान झाले.

निवडणुकी दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाच्या रांगा दिसत होत्या महिला मतदारांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत भाग घेतला. एकंदरीत मतदान प्रक्रिया संपूर्णपणे शांततेत व उत्साहात पार पडली एकूण ४२ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले. आता दिनांक १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाल्यानंतरच खरे बाजीगर कोण हे निश्चित होणार आहे.

बॉक्स

ऊर्मठ ए.पी.आय. महल्ले यांच्या वागणुकीने पोलीसांविषयी उमेदवारांसह मतदारांनी केली नाराजीव्यक्त

दरम्यान पोलीस प्रशासनाच्या शिरपूर पोलीस स्टेशनला असलेले उर्मठ ए.पी.आय. महल्ले यांनी नाहक मतदारांना तसेच उमेवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना अर्वाच्य व शिवराळ भाषेत बोलल्याने पोलिसां प्रती नाराजी व्यक्त करण्यात आली, अशा वात्रट अधिकाऱ्याने पोलिसांची प्रतिमा नाहक मलीन झाली. बाकी शिरपूर पोलीस स्टेशन ला लाभलेले शांत व संयमी ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

editor-in-chief

editor-in-chief and Owner GOPAL D.WADHE - 8308444934 active news - "सत्याचा सारथी असत्याचा कर्दनकाळ" महत्वाची सूचना : activenews.in या न्यूज डिजीटल मेडिया मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active news चे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Back to top button
active news या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री गोपाल वाढे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .